You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

श्री 1008 ऋषभनाथ दिगंबर जैन मंदिर येथे पर्युषण पर्व

विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ : समाजबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण

sachin pande

मालेगाव :- जैन धर्मातील पर्युषण (दक्षलक्षण ) पर्वाला आज ३ सप्टेंबरपासून सुरुवात होनार.येत्या १३ सप्टेंबरपर्यंत शहरातील श्री १००८ ऋषभनाथ दिगंबर जैन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत असून , भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे .
जैन धर्मातील काही महत्वपूर्ण धार्मिक उत्सवांमध्ये पर्युषण ( दशलक्षण ) पर्वाचेही एक वेगळे महत्त्व आहे . या पर्वामध्ये दिगंबर समुदायातील जैन बांधव १० दिवसांपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करतात . पर्युषणचा सामान्य अर्थ असा आहे की ,मनातील सर्व विकार कमी करणे.म्हणजेच या उत्सवात आपल्या
मनात उद्भवणारे सर्व वाईट विचार दूर करण्याचा उपवास म्हणजे पर्युषण पर्व होय . जैन धार्मिक नेते , बांधव या पर्युषण पर्वाच्या काळात मनातील सर्व विकार – क्रोध,मान,माया,लोभ,मत्सर आणि वैराग्यापासून मुक्त होण्यासाठी मार्ग शोधतात. या सर्व विकारांवर विजय मिळवल्यानंतर त्यांना स्वतःला शांती आणि शुद्धतेकडे नेण्याचा मार्ग सापडतो . भगवान महाविरांनी सांगितलेल्या १० नियमांचे पालन करुन पर्युषण
पर्व साजरा करतात .
त्या निमित्ताने दशलक्षण महापर्व
दैनिक कार्यक्रम मध्ये मंगळवार 3,9,2019 ते 13,9,2019
पर्यंत कार्यक्रम सकाळी 6:00 ते 6:45 सामायिक पाठ बारा भावना 6:45 ते 7:30 प्रवचन 8:00 ते *8:30 जिनेंद्र अभिषेक 8:30 ते 9:30 पुजन भक्तांभर पाठ
* 9:30 ते 10:00 तत्वार्थसूत्र
* दुपारी 3:00. ते 3:45 प्रवचन
*6:30 ते 7:30 सामायीक
*8:00 ते 8:45 प्रवचन
*रात्री 9:00 ते 10 सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात येणार आहे
या पर्युषण पर्वाच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त समाजबांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन
श्री १००८ ऋषभनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट व सकल दिगंबर जैन समाज मालेगावच्या वतीने करण्यात आले आहे……

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close