You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

शहरात वाढत्या चिडीमारीला जबाबदार कोण

सुसाट वाहनांना ब्रेक कधी लागणार ?

शहरात वाढत्या चिडीमारीला जबाबदार कोण
: सुसाट वाहनांना ब्रेक कधी लागणार ?

SACHIN PANDE

मालेगांव : – शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून चिडीमारांनी डोकेवर काढल्याचे चित्र आहे . मात्र चिडीमारावर कार्यवाही करण्यास पोलिस असमर्थता दाखवित असल्याने पोलिसांच्या कार्यप्रणाली विरुध्द विद्यार्थीनी व पालक वर्गातून रोष व्यक्त करण्यात येत आहे.
मालेगांव शहरामध्ये चिडीमारी करणाऱ्यांची संख्या कमी न होता दिवसेंदिवस वाढत चालली आहे . बस स्थानकासह विविध शाळा , महाविद्यालय परिसर तथा शिकवणी वर्गास ये – जा करणाऱ्या विद्यार्थ्यांनींना चौका चौकात या चिडीमारीचा अतोनात त्रास सहन करावा लागत आहे . त्याच प्रमाणे बाहेर गावावरुन शाळा , कॉलेज , महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थीनींना सुध्दा चिडीमारंचा त्रास होत आहे . शहरासह ग्रामिण भागतील.
विद्यालय परिसराच्या बाहेर अनेक टवाळखोर सुसाट वेगाने दुचाकी चालवुन आश्लिल हातवारे , टाऊटींग आदी प्रकार टवाळकी करतात सदर प्रकार विद्यार्थीनीने घरी सांगीतल्यास आपलेच शिक्षण बंद होईल म्हणून सदर प्रकार मुकाट्याने संहन करतात शाळा , महाविद्यालये सकाळी भरण्याच्या व सायंकाळी सुटण्याच्या वेळेस पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे .

कारवाई करण्याकडे दुर्लक्ष …..
विद्यालय , महाविद्यालय परिसरात गस्त तररसोडा मेन रोडने सुसाट वाहने चालविणाऱ्यावर सुध्दा कारवाई करण्यात येत नाही त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणाली वर प्रश्न चिन्ह निर्माण झाले असल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देण्याची मागणी पालकामधून जोर धरु लागली आहे .

बॉक्स
थोर महात्म्यांच्या फोटो समोर उभे राहून तसेच शहरातील विविध चौकामधील शिव चौक गांधी चौक जुने बस स्थानक आठवडी बाजार तसेच जैन मंदिर समोर अकोला फाटा हे चिडीमार यांचे मुख्य ठिकाण असून चिडीमार करणारे तेव्हा काही हे पानटपऱ्या हॉटेल्स यांचा, आसरा घेऊन आपले चिडीमारी चे कार्य चालू ठेवतात दुकान लाईन मध्ये अक्षरशा सणासुदीची मध्ये महिलांना व मुलींना आपला जीव मुठीत घेऊन चालावे लागते काहीही चिडीमार यांची ताकद इतपर्यंत ही वाढलेली आहे चालत्या महिला व मुलींना धक्का मारतात याची तक्रार देण्यास महिला व मुली पुढाकार घेत नाहीत..

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close