You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा शिक्षणतज्ज्ञ यांच्याकडून गरजू मुलांना गणवेश वाटप…

स्थानिक जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथ. मराठी मुलांची शाळा अडगाव बु. येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगल सिंग डाबेराव आणि शिक्षणतज्ज्ञ अशोक राम घाटे यांनी शाळेतील १० मुलांना स्वखर्चाने गणवेश वाटप केले.
शाळेतील Sc, ST, BPL मुले आणि सर्व मुलींना गणवेश मिळतात परंतु ज्या मुलांना गणवेश मिळत नाहीत .. अशा दहा होतकरू गरीब मुलांना गणवेश वितरित केलेत.. याप्रसंगी अडगाव बु.केंद्राचे केंद्रप्रमुख किशोर कोल्हे, जि.प. व प्रा. शाळा अडगाव मराठी मुलेचे मुख्याध्यापक सोहन दामधर, नंदकिशोर अढाऊ, ज्योती केदार, लता ढेपे, सुभाष ढोकणे , उज्वला उकर्डे, ज्योती लटकुटे उपस्थित होत्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close