You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्राईममहाराष्ट्र

महामार्गाच्या कडेला व्यायाम करताना वाहनाची धडक; तीन शालेय विद्यार्थी ठार

अंबड: प्रतिनिधी

तनवीर बागवान

Active न्युज टीम

महामार्गाच्या कडेला व्यायाम करत असताना एका भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तीन शालेय विद्यार्थी ठार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास गेवराई तालुक्यातील गढी जवळ घडली. हे तीनही शालेय विद्यार्थी गेवराई तालुक्यातील तळेवाडी येथील आहेत.

सुनिल प्रकाश थोटे (वय १४), तुकाराम विठ्ठल यमगर (१६) व अभिषेक भगवान जाधव (१४) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे तिघेही गेवराई तालुक्यातील तळेवाडी येथील राहणार असून ते शनिवारी पहाटे गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या कल्याण -विशाखापट्टणम या महामार्गावर व्यायाम करण्यासाठी गेले होते. याच दरम्यान गढीकडून माजलगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने या तिघांनाही पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये तिघांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांसह ट्राफिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान या घटनेने तळेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

Share
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...
Tags
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close