You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्राईम

पुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात, नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

इरटीका व ट्रक अपघातात नऊजण जागीच ठार

 

Active न्युज टीम

पुणे : पुणे-सोलापूर रस्त्यावर झालेल्या मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. पुणे-सोलापूर रस्त्यावरील कदम वाक वस्ती ग्रामपंचायतीजवळ ही घटना घडली. रात्री एक वाजेच्या सुमारास अर्टिगा कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी दुभाजक तोडून समोरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली. या भीषण अपघातामध्ये चार चाकी वाहनामधील 9 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सर्व मयत यवत येथील रहिवासी आहेत.

या घटनेत मृत्युमुखी पडलेले नऊ जण पुणे जिल्ह्यातील यवतचे राहणारे असून सर्वजण महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी आहेत. हे सर्वजण शुक्रवारी सकाळी रायगड जिल्ह्यात फिरायला गेले होते. रायगडावरून परत येत असताना कदम वाक वस्ती या गावाजवळ गाडी चालवणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी दुभाजक तोडून समोरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली. यामध्ये अर्टिगा कारमधील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला.

अपघात इतका भयानक होता की यामध्ये कारचा अक्षरश: चुराडा झाला. या घटनेत अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूर महमद अब्बास दाया, परवेज आशपाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत घिगे, दत्ता गणेश यादव आणि जुबेर अजिज यांचा मृत्यू झाला आहे.

 

 

Share
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...
Tags
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close