You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
महाराष्ट्र

विवेकानंद प्रशिक्षण संस्था मेहकर येथे राष्ट्रीय युवा संसद कार्यक्रम संपन्न

गजानन तुपकर
तालुका प्रतिनिधी मेहकर
9922477647

Active न्युज टीम

नेहरू युवा केंद्र संघटन महाराष्ट्र व गोवा राज्य संचालक सौ ज्योती मोहिते यांच्या मार्गदर्शनानुसार नेहरू युवा केंद्र बुलढाणा द्वारा विवेकानंद प्रशिक्षण संस्था मेहकर येथे राष्ट्रीय युवा संसद कार्यक्रम आयोजित करण्यात आला

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम भराड (अध्यक्ष विवेकानंद प्रशिक्षण संस्था मेहकर), व प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री सुरेशचन्द्र वाकोडे (सब रजिस्टर मेहकर )डॉ.अमोल देशमुख( मोटिवेशनल स्पीकर) श्रीकांत पोधडे( योगा प्रशिक्षक) रमेश उतपुरे (प्रकल्प अधिकारी न.प मेहकर) गजानन पायघन (अध्यक्ष तालुका ग्रंथालय संघ )राजेश्वर वानखेडे (सा. कार्यकर्ते )शा.औ. प्रशिक्षण संस्थेचे गट निदेशक आर डी चौधरी, एस बी सरकटे ,उपस्थित मान्यवरांनी विविध विषयांवर शेकडो युवकांना कौशल्य विकास व  स्‍वयंरोजगार, रोजगार विषयक आरोग्‍य व योगा प्रशिक्षण  स्पर्धा परीक्षांविषयी्‍, स्व कर्तृत्‍वातून यशस्वी व स्वावलंबी होण्याचा मार्ग, विविध क्षेत्रातील युवकांना यशस्वी होण्याच्या संधी, विविध शासकीय योजना राबविणे करिता ग्रामीण व शहरी युवकांनी एकत्र येऊन नोंदणीकृत गट स्थापन करणे ,ग्रामस्वच्छता, पाणी व्यवस्थापन ,महिला सक्षमीकरण, सांस्कृतिक ,क्रीडा ,शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय राहून कार्य करणे ,शेतकरी विषयक उपक्रम( सामूहिक शेती उपक्रम), स्वतंत्र उद्योग व्यवसाय सुरू करणे याविषयी मोलाचे मार्गदर्शन युवकांना करण्यात आले .तसेच उपस्थितीमध्ये बि एन ताठे,जी एस धोटे, सौ ए एस वरणकार व इतर कर्मचारी वृंद,पऱ्हाड( तलाठी दे. माळी) अंकुश गोरे (कर सल्लागार) केशव मगर ,जयराम बकाल ,सखाराम भराड, शिवशंकर मगर ,केशव गारोळे ,संजय देवकर, राजेश महाजन. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे व विवेकानंद प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षणार्थी व तालुक्यातील युवा वर्ग उपस्थित होते .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नयन खरात( सा.कार्यकर्ते) यांनी केले व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंद बांगडे ,शेषराव भराड ,अनिकेत शिंदे, सुदाम पायघन, शिवाजी शिंदे, बलजीत सिंग मेहरा ,शिवकुमार काटकर ,यांनी परीश्रम घेतले.

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close