You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
महाराष्ट्र

सामाजिक कार्यकर्त्या मनिषा राऊत यांच्या सतर्कते मुळे एक महिला व मुलांचे वाचले प्राण

Active न्युज टीम

पुणे:-आज सकाळी एक महिला दोन लहान मुलांसह पुणे सोलापूर रोडवर रडत तोंडातल्या तोंडात पुटपुटत घाबरलेल्या अवस्थेमध्ये फिरत होती, त्यावेळी हडपसर येथील सामाजिक कार्यकर्त्या मनिषा राऊत यांच्या आॅफीस समोर दिसली ती काही तरी वाईट करण्याच्या उद्देशाने तेथे आली असावी, तिच्या हतबलतेचा काही टवाळखोर गैरफायदा घेण्याच्या तयारीत होते,तिची हतबलता पाहून  तिची छेड काढत होते,त्यामुळे मनिषा राऊत यांनी तात्काळ टवाळखोर तरुणांना हाकलून देऊन तीला मुलांसह त्यांच्या ऑफिस मध्ये आणले,तीला काय झाले विचारले असता नवऱ्या सोबत भांडण झाल्यामुळे नवऱ्याने हाकलून दिले आहे ,वडगाव शेरी येथुन सोलापुर रोड पर्यंत लहान लहान मुलं घेवुन जीवाचे बरे वाईट करायच्या उद्देशाने हडपसर रोडवर आली असल्याचे तीने सांगितले. मनिषा राऊत यांनी लगेच तेथील डॉक्टर अश्विनी  शेंडे मॅडम व NGO कार्यकर्त्या धनश्री काळे मॅडम यांना मदतीला बोलावले त्या माय लेकरांना खाऊ घातले पोलीस स्टेशन ला  नेले व त्या महिलेच्या नवऱ्याला बोलावून घेवुन दोंघाना समजावून सांगितले. संसार दोघांचा दोघांनी फुलवायचा, मी रुसले तर तू मनवायचे ,तू रागावला तर मी मनवायचे संसार दोघांचा दोघांनी फुलवायचा,असे समजावून सांगून हसत दोघांना निरोप दिला,यावेळी पोलिसांनी मोलाचे सहकार्य केले.त्या पतीपत्नीने पोलिसांचे व मनिषा राऊत यांचे आभार मानले,यावेळी एक संसार मार्गी लागल्याचे समाधान लाभले असे उदगार राऊत यांनी व्यक्त केले.मनिषा राऊत यांच्या सामाजिक  कार्यामुळे त्यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close