You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्राईम

⚡⚡⚡⚡ ब्रेकिंग न्यूज⚡⚡⚡⚡ दोन चिमुकल्यांना फासावर लटकवून स्वतःलाही संपविले

Active न्युज टीम

आईने आपल्या दोन चिमुकल्यांसह स्वतः आत्महत्या केल्याची घटना वाशिम जिल्ह्यातील तोंडगाव इथे घडली. या घटनेमुळे प्रत्येकाचं मन सुन्न झालंय. जयश्री गजानन गवारे (28), गणेश गजानन गवारे (05) आणि मोहित गजानन गवारे (03) अशी मृतकांची नावे आहेत. आत्महत्येमागचं नेमकं कारण अजून समोर आलेलं नाही. पण कौटुंबीक वादातून ही आत्महत्या झाली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

वाशिम तालुक्यातील तोंडगाव हे माहेर असलेल्या जयश्री यांचा विवाह तालुक्यातील जांभरुण नावजी येथील गजानन गवारे यांच्यासोबत झाला होता. काही वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांना दोन अपत्य झाली. त्यानंतर पती-पत्नीमधील वाद पोलिसांच्या उंबऱ्यावर पोहोचला होता. त्यामुळे जयश्री मागील काही महिन्यांपासून मुलांसह माहेरी तोंडगाव येथे वास्तव्यास होती.

सकाळी चिमुकल्यांना शाळेत पाठविण्याची तयारी सुरु असताना जयश्री यांनी दोन्ही चिमुकल्यांना फाशी दिल्यानंतर स्वत:ही घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनाम्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलविले.

जयश्री यांची आत्महत्या कौटुंबीक वादातून झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी तपास केल्यानंतरच नेमकं कारण समोर येणार आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत. दोन निरागस मुलांसह महिलेने आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close