You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
मालेगाव

दांडीबहाद्दर, नशेडी व कामचुकार तलाठ्याची तहसिलदाराकडे तक्रार

***********************जाहिरात **************************

शिरपूर जैन येथील प्रकार

शिरपूर दि.१७ जुलै (प्रतिनिधी)

Active न्युज टीम

शिरपूर जैन येथील शेतकरी रफिक खैरु रेघीवाले यांनी दिनांक १७ जुलै २०१९ रोजी शिरपुर भाग २ चे तलाठी अंभोरे हे मागील ३ महिन्यांपासून तक्रारदाराचे आईच्या नावाने असलेल्या जी फार्मची सातबारा रेकॉर्ड ला नोंद घेत नसल्याची तक्रार मालेगाव तहसीलदार यांच्याकडे दिली आहे.

तक्रारदाराने तक्रारीत नमूद केले आहे की, मागील तीन महिन्यापासून शिरपूर भाग २ चे तलाठी अंभोरे यांच्याकडे तक्रारदाराचे आईचे नावाने असलेला जि फॉर्म दिलेला आहे. तलाठी आंभोरे हे त्यांच्या कार्यालयात सतत गैरहजर राहतात. कार्यालयात गेल्यानंतर उपस्थित मंडळाधिकारी यांना संबंधित तलाठी याविषयी विचारणा केली असता ते त्याचे पाठराखण करतात. सदर तलाठी हे शेतकऱ्याला उर्मट भाषा वापरून कार्यालयातून हाकलून देतात व तहसीलदारच नाहीतर कुणाकडेही तक्रार करा आमचे काहीही वाकडे करू शकत नाही अशा प्रकारची भाषा वापरली जाते. असे तक्रारदाराने तक्रारीत नमूद केले आहे. सदर तलाठी हे कार्यालयामध्ये दारूच्या नशेत असतात आणि अशा नशेडी व कामचुकार तलाठ्यावर कठोर कारवाई केली जावी असे तक्रारदाराने सदर तक्रारीत नमूद केलेले आहे.

***********************जाहिरात **************************

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close