You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
मालेगावलाईफस्टाइल

विद्यार्थ्यांची तहान भागवण्यासाठी दूकानदार करतोय पदरमोड!

शिरपूर येथील छोटू देशमुख यांचा स्तुत्य उपक्रम

**********************जाहिरात ****************************

शिरपूर दि .१६ (प्रतीनिधी)

Active न्युज टीम

कोणासोबत कसलाही करार झालेला नसताना एक स्थानिक व्यावसायिक दर महिण्याला १० हजार रुपये पदरमोड करतोय. शुद्ध आर.ओ. पाण्याची पाणपोई लावून नित्यनियमाने शेकडो शालेय विद्यार्थ्यांची व वाटसरुंची तहान भागवतोय.म्हणूनच छोटू देशमुख हा ‘जलदूत’ सध्या शहरातील जनतेच्या कौतुकाचा विषय झाला आहे.

शिरपूर जैन हे जैनांची काशी, पंचक्रोशीतील सर्वधर्मीय जनतेचे आराध्य दैवत जानगीर महाराज संस्थान, ५९ गावांचे पोलीस स्टेशन, कृषी उत्पन्न उपबाजार समिती, मालमत्ता खरेदी-विक्रीचे दुय्यम निबंधक कार्यालय, केजी टू पीजी शिक्षणाची व्यवस्था असणारे शिक्षण केंद्र शिरपूरला असल्यामुळे इथे सतत लोकांची राबता असते.याच शहरात स्थानिक ढवळे विद्यालयाजवळ छोटू देशमुख यांचे शिव ट्रेडर्स हे किराणा मालाचे भव्य प्रतिष्ठाण आहे.

यावर्षी उन्हाळा प्रचंड तापायला सुरुवात झाली. तेव्हापासून छोटू देशमुख यांनी आपल्या दुकानसमोर आर.ओ वाटरच्या १०-२० जार  मांडून पानपोई सुरु केली. उन्हाळ्यात दररोज ३०-३५ जार शुद्ध व शितल पाणी या पाणपोईला लागायचे. त्यावेळी साधारणतः देशमुख यांनी दररोज ६०० ते ७०० रुपये पाणपोईसाठी खर्च केले.

पावसाळा सुरु झाला म्हणून छोटू देशमुख यांनी एक दिवस पानपोई बंद केली. तर शाळेतील मुले रिकाम्या बॉटल घेऊन दुकानसमोर घुटमळताना त्यांना दिसली. त्यांचे अंतःकरण द्रवले आणि त्यांनी परत ही पाणपोई सुरु केली.

सध्याही शेजारच्या ढवळे विद्यालयातील विद्यार्थी व वाटसरु यांना किमान १५-२० जार  शुद्ध पाणी लागते.सरासरी ५०० रु. रोजची पदरमोड होते.तरी सुद्धा छोटू देशमुख नेटाने पाणपोई चालवत आहेत. त्यामुळे सर्वत्र त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे शाळेला बंधनकारक असते.अनुदानासाठी ज्या मुलभूत सोई सुविधा अत्यावश्यक असतात. त्यात पिण्याचे शुद्ध पाणी अग्रक्रमाने असावे लागते. परंतू स्थानिक ढवळे विद्यालयातील विद्यार्थी या खाजगी पाणपोईवर पाणी पिताना दिसून येतात.ही शताब्दी सोहळा साजरा केलेल्या या शाळेतील शाळा,शिक्षक व संस्थाचालक यांच्यासाठी लाजीरवाणी बाब असल्याची प्रतिक्रिया अनेक पालकांनी प्रस्तूत प्रतिनिधीशी बोलताना दिली.

**********************जाहिरात ****************************

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close