You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
शिक्षण व नोकरी

शताब्दी पार करूनही मुलभुत सुविधांचा अभाव

शिरपूर येथील ढवळे विध्यालायातील प्रकार

******************* जाहिरात ******************

शिक्षणप्रेमी नागरिक व पालकांची संचालकांकडे तक्रार

शिरपूर दि.१४ जुलै (प्रतिनिधी)

शताब्दी महोत्सव साजरा केलेल्या स्थानिक ढवळे विद्यालयात मुला-मुलींसाठी सुसज्ज शौचालय, स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी, दिव्यांगांसाठी रँप,सकस पोषण आहार, क्रिडा साहित्य इत्यादी मुलभूत सुविधा आणि  शिष्यवृत्ती-नवोदय सारख्या परिक्षांचे पूरक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळत नसल्याने शिक्षणाचे ‘तीन तेरा वाजल्याची’ तक्रार स्थानिक सामाजिक कार्यकर्ते संतोष भालेराव आणि इतर शिक्षणप्रेमी नागरिक व पालकांनी दिनांक ११ जुलै रोजी शिक्षण संचालक, शिक्षण अधिकारी व जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.

जिल्ह्यातील जुन्या व मोठ्या शाळांपैकी एक असणाऱ्या कै. तात्या ढवळे विद्यालयाने गेल्यावर्षी आपल्या शिक्षण संस्थेचा शताब्दी महोत्सव मोठ्या थाटात साजरा केला होता.मंत्री महोदय,अधिकारी- पदाधिकारी, माजी विद्यार्थी शाळेत आले हार-तुरे घेऊन व स्तुतीसुमने उधळून गेले. शाळेत मुलींना, शिक्षिकांना प्रसाधन गृहाची/शौचालयाची व्यवस्था नाही . घसरलेल्या शैक्षणिक दर्जाची खदखद जागरूक पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांच्या मनात कायम होती. तो रोष शिक्षणमंत्री, शिक्षण संचालक, जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार करुन व्यक्त झाला आहे.

शाळेत मुलां-मुलींसाठी सुसज्ज प्रसाधनगृह नाहीत.शिक्षक RO चे पाणी पितात.परंतू विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची टाकी महिनो न महिने स्वच्छ केली जात नाही. शाळेत दिव्यांगांसाठी रँप नाही. तरी सुद्धा या शाळेतील निवडणूक केंद्रातून लोकसभा निवडणूकीचे मतदान पार पडल्याचे आश्चर्य तक्रारीत व्यक्त केले आहे.खिचडीत भाजीपाला शोधून सापडत नाही.बिस्कीटे, केळी,खजूर,अंडी हा पुरक आहार मागे कधी दिला होता, हे विद्यार्थीही सांगू शकत नाहीत. मेनुप्रमाणे पोषण आहार शिजवून दिला जात नाही. म्हणजेच कडधान्य व दाळींचा या मोठ्या शाळेत प्रचंड काळाबाजार केला जातो, असा आक्षेप तक्रारीत नमुद केला आहे.

शाळेतील शिक्षकांत व्यसनाधिनतेचे प्रमाण लक्षणीय आहे.मद्यपान,धुम्रपान,गुटखा, खर्रा, पान खाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कसलाच अंकुश राहलेला नाही.आदर्श आचरणाचा  (code of conduct) हा भंग असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.बरेच शिक्षक-शिक्षिका मुख्यालयी नसतात.त्यामुळे उशिरा येणे, लवकर जाणे नित्याचेच झाले आहे. शासनाचे निर्देश असताना सुद्धा वृक्षारोपण केवळ कागदावरच झाले आहे. शाळेत आज फक्त जुनीच झाडे दिसतात. शाळेच्या अवतीभवती शेती करुन भरघोस उत्पन्न घेतले जाते.पण ते उत्पन्न शाळेऐवजी संस्थाचालकाच्या विकासासाठी वापरल्या जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

शाळेत क्रिडांगण आहे.क्रिडा शिक्षक आहेत.पण खेळाची मैदाने तयार नाहीत.विद्यार्थ्यांना क्रिडा साहित्य दिल्या जात नाही. खेळाचे प्रशिक्षण दिले जात नाही.स्वकष्टाने जिंकलेल्या मुलांसोबत फोटो काढून बातम्या मात्र दिल्या जातात.शाळेतील एक क्लर्क नेहमीच वाशिमला दिसतात.खाजगीत अनेकांना विचारले तर ते वरीष्ठ कार्यालयात गेले,असे मिस्कीलपणे सांगीतले जाते.असे तक्रारीत नमूद केले आहे.

एकूणच शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, मुलभूत सुविधा व निकोप वातावरण न देणाऱ्या शिक्षण संस्थेची प्रामाणिक अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. अन्यथा १५ अॉगस्ट स्वातंत्र्यदिनी तिव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा तक्रारीतून देण्यात आला आहे. या तक्रारीवर संतोष नामदेव भालेराव प्रदेश कार्यकारिणी सदस्य माळी महासंघ यांच्यासह शहरातील जागरुक पालक व शिक्षणप्रेमींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

तक्रारकर्त्याची प्रतिक्रियाः कर्मचाऱ्यांतील व्यसनाधिनता व दुफळी, ढिसाळ प्रशासन, संचालक मंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष आणि पर्यवेक्षण यंत्रणेनी केलेली अर्थपूर्ण डोळेझाक यामुळे या शाळेतील शिक्षणाला दर्जाच उरला नाही. म्हणून नाईलाजाने हे पाऊल उचलले आहे.

– संतोष नामदेव भालेराव(तक्रारकर्ते तथा प्रदेश सदस्य अ.भा.माळी महासंघ)

शाळेत पिण्याच्या (शुद्ध/स्वच्छ) व्यवस्था  नसल्याने मधल्या सुट्टीत मुले शाळेच्या बाहेर येऊन एका दानशूर व्यक्तीने सुरु केलेल्या मोफत पाणपोईवर तहान भागवितांनाचा एक क्षण

******************* जाहिरात ******************

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close