You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
महाराष्ट्र

प्रतिपंढरपुर देऊळगाव माळी येथे रंगणार महाराष्ट्रातील सर्वात मोठा दहीहंडी सोहळा

****************जाहिरात ****************

****************जाहिरात ****************

 

मेहकर/गजानन तुपकर-प्रतिनिधी,9922477647.

Active न्युज टीम

मेहकर तालुक्यातील प्रतिपंढरपुर म्हणून परिचित असलेले देऊळगाव माळी हे सर्वगुणसंपन्न गाव आहे. या ठिकाणी दरवर्षी आषाढी पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी गोविंदा गोविंदा च्या गजरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केल्या जातो.201 लिटर दह्याची ही दहीहंडी महाराष्ट्रातील आजपर्यंतची सर्वात मोठी दहीहंडी म्हणून प्रसिद्ध आहे.

प्रतिपंढरपुर देऊळगाव माळी येथील विठु माऊलीच्या मंदीराचा चारशे वर्षांपूर्वीचा अतिप्राचीन असा इतिहास आहे.पारंपारिक कथानकानुसार दरवर्षी आषाढी पौर्णिमेच्या रात्री 12 वाजता विठ्ठल-रुख्मिणी पंढरपुरहुन देऊळगाव माळी येथे येतात. म्हणून पौर्णिमेच्या रात्री श्रींचा जन्मोत्सव म्हणजे गोपाळकाला होतो. दुसर्‍या दिवशी दहीभाताचा प्रसाद म्हणून दहीहंडी फोडल्या जाते. ही दहीहंडी महाराष्ट्रातील आजपर्यंतची सर्वात मोठी दहीहंडी म्हणून प्रसिद्ध आहे. तिसऱ्या दिवशी सकाळी टाळ दिंड्यांच्या गजरात पालखी सोहळा होतो. या पालखी सोहळ्यात पंचक्रोशीतील शेकडो दिंड्या सहभागी होतात.

सुमारे चारशे वर्षांपूर्वी या गावात पंढरपुर येथुन एका आजीने आणलेल्या विठ्ठल-रुख्मिणी च्या लाकडी मुर्त्या आजही या ठिकाणी मंदीरात आहेत. त्यामुळे जे वारकरी पंढरपुरला जाऊ शकत नाहीत, ते दरवर्षी आषाढीला प्रतिपंढरपुर देऊळगाव माळी येथे येऊन पांडुरंगाची वारी करतात व पंढरीच्या वारीचं पुण्य पदरात पाडून घेतात. कारण येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची भावना ही अशी असते की,

“पंढरीचा पांडुरंग देऊळगावी आला…..

ठायीच बसला भक्तांसाठी……!

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close