You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्राईममहाराष्ट्र

एकतर्फी प्रेमातून केली मजनूने युवतीची हत्या

चाकूने १८ वेळा भोकसले; महात्माफुले महाविध्यालयासमोरील घटना ,चाकू लागल्याने मैत्रीण जखमी ; इर्विन रुग्णालयात उपचार सुरु.

अमरावती/प्रतिनिधी

(Active न्युज टीम)

राजापेठ पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या मुधळकर पेठ परिसरातील महात्माफुले महाविद्यालयात बि. कॉम. प्रथम वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थिनीचा एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरू मजनूने चायना चाकुने तिच्या शरिरावर १८ वेळा सपासप वार करून तिची हत्या केल्याची घटना दि.९ जुलै रोज दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
अमरावती शहरात गेल्या काही वर्षात गुन्हेगारीचा स्तर उंचावला , पोलिस प्रशासन गुन्हेगारीवर अंकूश लावण्यास अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. काही दिवसापूर्वी नगर, जवाहर गेट परिसर येथे अशाच प्रकारच्या घटना समोर आल्या होत्या. याच घटनेची पुनर्रावृत्ती झाल्याचे दिसून येते. ९ जुलै रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास महात्माफुले महाविद्यालयात बि.कॉम प्रथम वर्षाला शिकत असलेली अर्पिता ठाकरे वय १९ वर्ष, रा. कवठा, जि. अमरावती, ही आपल्या मैत्रीनीसोबत घरी जात असताना अचानक एक माथेफिरू मजनू तुषार मसकरे (२२) रा. मलकापूर याने अर्पिताला रस्त्यात अडविले आणि काही विचार न करता खिशातील चायना चाकू काढून अर्पिताच्या शरिरावर १८ वेळा सपासप वार केले. चाकू अडविण्यासाठी अर्पिताच्या सोबत असणार्‍या मैत्रीणीने हात समोर केला असता तिच्या हाताला सुध्दा चाकू लागला. या घटनेत अर्पिता ठकरे हिचा घटनास्थळावरच मृत्यू झाला असून, तिच्या मैत्रीणीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
आरोपी तुषार हा अर्पिताला एकतर्फी प्रेमातून वारंवार त्रास देत होता. अर्पितासोबत लग्नासाठी तुषार आग्रही असल्यामुळे त्यांनी तिच्या घराच्यालोकांना सुध्दा या सदंर्भात माहिती दिली होती. पण घरच्यांना तसेच मुलीला तो पसंत नसल्यामुळे त्यांनी नकार दिला हेाता. प्रियसीने लग्नासाठी दिलेला नकार हा तुषार सहन करून शकला नाही व त्यांने तिचा खुन केला. भर रस्त्यावर घडलेला हा थरार नागरिकांनी आपल्या डोळयांनी पाहिला. दरम्यान नागरिकांनी आरोपीला पकडण्यासाठी धावाधाव सुरू केली असता आरोपी तुषार मसकरे हा नमुना गल्ली येथे एका घरात शिरून वेशभूषा बदलून पळण्याचा प्रयत्न करीत असताना नागरिकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला व पोलिसांच्या स्वाधिन केले.
या घटनेची वार्ता शहरात वार्‍यासारखी पसरली असता अनेक राजकीय संघटनांनी इर्वीन रुग्णालयाकडे धाव घेतली. इर्वीनमध्ये नागरिकांकडून पोलिस प्रशासनावर रोष व्यक्त करण्यात आला. या प्ररकणात जखमी मुलीने तक्रार नोदविली असून, आरोपि विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close