You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्राईममालेगाव

वाघी बु रस्त्या वरील त्या पुलाला कठडे असते तर त्यांच्या जिव वाचला असता?

शिरपूर पासून जवळच असलेल्या वाघी बु येथील २ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान दोन शाळकरी बहिण-भाऊ कु. पूजा बाळू पवार वय १४ वर्षे व पारस बाळू पवार वय ८ वर्ष ही दोन्ही भांडे पुराच्या भयंकर पाण्यामध्ये वाहून गेल्याची ह्रदय हेलवनारी दुःखद घटना घडली होती.

नेहमी प्रणाणे उजडाणार दिवस त्यापण दिवशी उजाडला होता, पण त्या चिमुकल्या काय माहित हा आपल्या शेवटचा दिवस असेल, नेहमी प्रमाणे आपल्या नादात सकाळी उठून शाळेत जाण्याची घाई करणार पोर आपल्या नादात होत. नेहमी प्रमाणे आपल्या आईला ओरडणार त्या पण दिवशी ओरडत होत, आई आवर मला शाळेत जायचे आहे. लवकर बाई ओरडता उशीर झाला तर आपल्या बोंबड्या शब्दात सकाळी सकाळी आईला बोलणार पोर उद्या या जगात नसणार हे सुद्धा त्या आईला माहित नव्हत, त्यांचा पुन्हा आवाज घुमला आई लवकर मला शाळेत जायचे आवरणा हो रे बाबा जा आणि लवकर ये…… पण जसा तो शाळेत गेला तो परत त्यांच्य मृतदेहच घरी आला. सकाळी आपल्या बोंबड्या शब्दात बोलणार आपल मुल या जगात नाही काय अवस्था झाली असेल त्या माऊलीची आई आई आवर अस म्हणारे पोर या जगात नाही राहली आहे. काय चालु असेल त्या आईच्या मनात? देवाला तर एकच मागित असेल हे बघायच्या आदी मी मेले का नाही.

या धक्यातुन बाहेर येताच त्या माऊलीला दुसरा धक्का लागला तो की त्यांची बहिण म्हणजे तीची मुलगी जी भावाला शाळेतून आण्याला गेले ती त्यांच्या सोबत गेली, देवा नेमक काय पाप केल त्या माऊलीने असाच प्रश्न तीच्या डोळ्यासमोर उभा राहिला असेल. सकाळी आवर लवकर मला शाळेत जायचे या पासून चालू झालेला तीचा आनंदी दिवस एका क्षणात स्मशान झाला होता. जणुतीची काय जगण्याची इच्छा नाही राहिल. संपुर्ण डोळ्यासमोर अंधार उभा राहिला, आपल्या भाबड्या मुंलाचा चेहरा तर मिळाला पाहल्या पण मुंलीचा चेहरा सुद्धा मिळाला नाही. काय अवस्था असेल त्या माऊलीची विचार जरी केला तर अंगावर काटा उभा राहतो. या दु:खातुन दिला सावरण्यची शक्ती देवो.

नेमक याला जबदार कोण? आहे. याचे उत्तर कोणाकडे आहे. इथले प्रशासन, शासन, का राज्यकर्ते, नेमक कोण उत्तर देणार त्या माऊलीला का आज पण थोड्या पैशाची मदत आणि दोन दिवस शोक नंतर परत एकदा अजून कुठली तरी घटना घडण्याची वाट बघत बसायचे, अजून किती दिवस हेच चालणार आहे. रोज जा ये करणऱ्या पुला जर कठडे असते तर त्यांचा जिव वाचला असता?  याल जबाबदार कोण ?

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close