You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
महाराष्ट्र

माण बीडिओंच्या बदलीचा ठराव

आकाश जगदाळे /दहिवडी

(Active न्युज टीम)

माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे.डी. शेलार यांच्या मनमानी कारभाराचा वैतागून त्यांच्या बदलीचा ठराव माण पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये करण्यात आला. 15 जुलैपर्यंत त्यांची बदली करावी अन्यथा 16 तारखेला बीडिओंच्या केबिनला टाळे ठोकण्याचा इशारा सदस्यांनी दिला.

माण पंचायत समितीच्या बैठकीत उपसभापती नितीन राजगे गट गट विकास अधिकारी यांच्या बदलीचा ठराव मांडला. या ठरावाला सर्व पं.स. सदस्यांनी पाठिंबा दिला. सभेत हा ठराव मंजूर करण्यात आला.

सरपंच संघटनेमार्फत या ठरावाला लेखी पाठिंबा देण्यात आला. सरपंच संघटनेमार्फत अध्यक्ष प्रशांत गोरड व उपाध्यक्ष वसंत सजगणे, तालुक्यातील अनेक सरपंच यावेळी उपस्थित होते.

यासंबंधी माहिती देताना सभापती रमेश पाटोळे व उपसभापती नितीन राजगे म्हणाले, गेल्या वर्षीही गटविकास अधिकारी यांच्या विरोधात असाच ठराव झाला होता. परंतु, जि.प.चे सीईओ कैलास शिंदे यांच्या आश्वासनानंतर त्यावेळी आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्यानंतरही गटविकास अधिकारी यांचा मनमानी कारभार सुरूच आहे. त्यामुळे पंचायत समितीची कामे खोळंबली जात असून जनतेचे नुकसान  होत आहे. राजकीय पदाधिकारी यांच्यामध्ये भांडणे लावणे यासारखे अनेक उद्योग गेले दीड वर्ष सुरू आहेत त्यांच्या या कामात वैतागून त्यांच्या बदलीचा दुसरा ठराव या बैठकीत घेण्यात आला दरम्यान दि.१५जुलैपर्यंत गटविकास अधिकारी यांची बदली व्हावी अन्यथा १६जुलैला त्यांच्या केबिनला टाळे ठोकण्याचा ईशारा यावेळी देण्यात आला आहे.

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close