ब्रेकिंग

सेवानिवृत्त ग्रामसेवकाची पदभार देण्यास टाळाटाळ

0 0 6 5 0 2
[wonderplugin_carousel id="1"]

एक महिना उलटूनही ग्रामसेवक कार्यालयात थांबेना



शिरपूर :


शिरपूर येथील ग्रामसेवक अरुण इंगळे हे मे २०२३ मध्ये सेवानिवृत्त झाले असून गत एक महिन्यापासून नेमणूक झालेले नवीन ग्रामसेवक संजय घुगे यांच्या कडे सपूर्ण पदभार नसल्याचे नविन ग्राम सेवक घुगे यांनी सांगितले त्यामुळे ते एक महिना उलटूनही कार्यालयामध्ये येत नसल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत.
जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या ग्रा.पं.चे ग्रामसेवक अरुण इंगळे हे मे 2023 मध्ये सेवानिवृत्त झाले. मात्र अद्याप त्यांनी नवीन ग्रामसेवकाकडे पूर्ण कार्यभार दिल्या नसल्याचे सध्या नव्याने रुजू झालेले शिरपूर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक संजय घुगे यांनी सांगितले. तसेच याबाबत मी आजच गट विकास अधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन तशी माहिती देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिरपूर ग्रामपंचायतीने गावातील खुल्या जागा व ग्रामपंचायत समोरील व्यापारी दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या व मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागा भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव एप्रिल 2023 मध्ये घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. व काही मर्जीतील लोकांना त्या जागेचे अवैधपणे आणि नियमांना तिलांजली देऊन अत्यंत नाममात्र अनामत रक्कम भरून घेऊन सदर खुल्या जागा वाटप करण्यात आल्याची चर्चा सध्या येथील नागिकामधून होत आहे. याबाबत सविस्तर माहिती घेण्याविषयी ग्रामसेवक यांच्याशी संपर्क केला मात्र याबाबत सरपंच, सचिव ग्रामपंचायत सदस्य अथवा पार्टी चालक याबाबत कुठलीही माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तत्कालीन ग्रामसेवक सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी पूर्णपणे पदभार नवीन ग्रामसेवकाला दिलेला नाही. ग्रामपंचायतचे प्रोसिडिंग सुद्धा ताब्यात दिले नाही. नवीन ग्रामसेवकांच्या कार्यकाळामध्ये एक मासिक सभा घेण्यात आली, तीही नवीन प्रोसिडिंग वर घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायतीचे जुने प्रोसिडिंग पूर्णपणे भरलेले नसताना नवीन प्रोसिडिंग का तयार करण्यात आले ? असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतच्या कारभारावर नागरिकांच्या वतीने प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे!
ग्रामपंचायतच्या या अजब कारभाराबद्दल गावामध्ये चर्चेला मात्र प्रचंड उधाण आल्याचे दिसून येत आहे.
प्रतिक्रिया –

मला शिरपूर येथे नियुक्ती मिळाल्या नंतर मला पूर्वीच्या ग्राम सेवक यांच्याकडून पूर्ण पदभार देण्यात आलेला नाही, याबाबत मी गट विकास अधिकारी यांना आज पत्र देणार आहे. -संजय घुगे ग्राम सेवक शिरपूर

  • माझ्या माहिती प्रमाणे चार्ज दिला आहे, तरीही मी दोन्ही ग्राम सेवकांशी चर्चा करून सविस्तर माहिती घेतो – किशोर काळपांडे गट विकास अधिकारी मालेगांव

तर सेवानिवृत्त ग्रामसेवक इंगळे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.(फोन रिसीव केला नाही)

3.3/5 - (3 votes)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 5 0 2
[wonderplugin_carousel id="1"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे