You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
महाराष्ट्रमालेगावलाईफस्टाइलवाशिम

ट्रक फसला की ! दर्जेदार कामाचा दावा फसला?

राज्य महामार्गावर ट्रक फसला, वाहनांच्या लागल्या रांगा

*************************जाहिरात ***************************

*************************जाहिरात ***************************

शिरपूर ता. 9 जुलै (Active न्युज टीम)

शिरपूर, रिसोड, सेनगाव मार्गे जाणाऱ्या मालेगाव- हिंगोली या राज्य महामार्गावर शिरपूरजवळ काल दि 8 जुलै रोजी एक ट्रक फसला होता. त्यामुळे वाहतूक खोळंबून दोन्हीही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नसताना या महामार्गावर वाहने फसत आहेत. म्हणजेच रस्त्याचा दर्जा कसा असेल आणि पर्यवेक्षण यंत्रणा यात कसे हात ओले करुन घेत असेल, हाच सध्या जिल्हाभरात चर्चेचा विषय बनला आहे.

मालेगाव-हिंगोली या राज्य महामार्गाचे काम सध्या सुरु आहे.विदर्भ-मराठवाड्याला जोडणारा सेतू असा गवगवा केलेला हा महामार्ग जनतेची डोकेदुखी बनतो की काय?

अशी लक्षणे सध्या दिसत आहेत. शिरपूर शहरापासून २ते३ कि.मी.अंतरावर काल अल्पशा पावसाने एक ट्रक रोडवरील चिखलात रुतून बसला होता. त्यामुळे या वर्दळीच्या रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचायला विलंब झाला.भाजीपाला, दूध, फळे उशिरा बाजारपेठेत गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. शिवाय शेतात आंतरमशागतीसाठी जाणाऱ्या कास्तकारांच्या कामाचा खोळंबा झाला. अशा अनेक घटना दररोज कुठे ना कुठे घडतांना दिसत आहे प्रशाशन मात्र बघ्याची भूमिका असल्याने सर्वसामान्य नागरिक  आश्चर्य व्यक्त करीत आहेत . र्यएकूणच या महामार्गाचे काम दर्जेदार होत नसल्याने जनतेला अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सिमेंट रोड असूनही जर या रोडच्या कडेला आज वाहने चिखलात फसत असतील तर रोडच्या कामाचा दर्जा कोण्या ज्योतिषाला विचारण्याची गरज उरालेली नाही. मातीमिश्रीत मुरुम टाकल्याने ह्या घटना वारंवार घडणार आहेत. विकासाच्या महामार्गाच्या गप्पा हाणणाऱ्यांनी आता तरी या रोडच्या दर्जाकडे सुद्धा लक्ष द्यावे.

‘निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर बुलडोजर चालवण्यात येईल’ असे  वक्तव्य केंद्रातील एका हेवीवेट मंत्र्यांनी यापूर्वी केले होते. याचा विसर नक्कीच या रोडच्या कंत्राटदारास पडला,असे दिसते. आता मात्र मंत्री महोदयांना आपल्या वक्तव्याचा  विसर पडू नये, अशी जनता अपेक्षा करत आहे.

एकूणच आम्ही विकासाचे महामार्ग निर्माण करत आहोत, असे दावे करणाऱ्यांचे दावे फसलेत की, चिखलात वाहने फसलीत; असा प्रश्न जनतेला पडला आहे.

 

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close