You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
महाराष्ट्र

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा — आ.अब्दुल सत्तार

पावसामुळे नुकसानग्रस्त परिसराची आ.अब्दुल सत्तार यांच्या कडून पाहणी

सिल्लोड, प्रतिनिधी :

अजय बोराडे:

Active न्युज टीम

प्रतिनिधी (दि.०६ ) — सिल्लोड – सोयगाव मतदारसंघात अतिवृष्टीमुळे अनेक हेक्टरवरील बियाण्यांसह ठिबकसंचांसह शेतजमीनींचे खुपच नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानींचे तात्काळ पंचनामे करावे व  शासनाकडे तातडीने माहिती देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याच्या सुचना माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी केली.

सिल्लोड – सोयगाव विधानसभा मतदारसंघात पावसामुळे विविध ठिकाणी शेती , बंधारे, पिके वाहून गेली तसेच पावसामुळे अनेक ठिकाणी घरे, पुल, इमारती, भिंती खचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पावसामुळे अजिंठा, शिवना, मागणी ,पिंपळदरी, सराटी, अंभई, उंडणगाव, आमसरी, खुपटा, वडाळी, पानवडोद खु. धोत्रा, डिग्रस, वाघेरा, जळकी बाजार आदि गावांसह सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील शेतक-यांच्या नुकसान ग्रस्त परिसराची संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी आ.अब्दुल सत्तार यांनी केली आहे. पावसामुळे नुकसानग्रस्त परिसराचा (दि.०५) शुक्रवार रोजी पाहणी दौरा माजीमंत्री आ .अब्दुल सत्तार यांनी केला आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अर्जुन पाटील गाढे, देविदास लोखंडे, रावकाका काळे, शंकरराव खांडवे, शेख सलिम, नारायण बनकर, प्रकाश जाधव, शेख ताज मोहम्मद, गजानन पोटदुखे, आत्माराम ताताडे, विलास कालभिले, भिमराव शिंदे, प्रकाश दांडगे, समाधान ताताडे, उत्तम कालभिले, उखर्डू ताताडे, गणपत कालभिले, दिगंबर जाधव, गजानन जाधव, प्रकाश करपे, आरेफ पठाण आदिंसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव (खु.)गावातील खचलेल्या विहीरीची माजीमंत्री आ. अब्दुल सत्तार यांनी पाहणी केली. आठ दिवसांपासुन सुरु असलेल्या अतिवृष्टीत झालेल्या दमदार पावसामुळे गोळेगाव खु. गावातील विहिरीचे कडे मोठ्या प्रमाणात खचला असुन हि विहीर शेजारी राहत असलेल्या नागरिकांसाठी खुपच धोकादायक बनली आहे.

 

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close