You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
कृषिवार्ता

किन्ही घोडमोड दुधाळा शिवारातील शेतजमीन गेली खरडून

शिरपूर परिसरातील शेतकऱ्यांना पावसाचा फटका !

गणेश घोडे  दि.०४ जुलै (प्रतिनिधी)

Active न्युज टीम

शिरपूर परिसरातील  दुधाळा,किन्हीघोद्मोड, वाघी बु.खंडाळा, आदी गावात दिनांक ०२ जुलै रोजी दुपारी अचानक आलेल्या पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

मालेगांव ते सेनगाव महामार्गाचे काम सुरु असल्याने अनेक ठिकाणी नाल्यांवर पुलाचे काम सुद्धा सुरु आहे. रस्ता बांधकाम ठेकेदाराने पुरेसी काळजी न घेतल्याने अनेक ठिकाणच्या नाल्यावरील बांधकाम ठिकाणी पाणी अडवल्या गेल्याने किन्ही घोडमोड, दुधाळा येथील शेतकरी भगवान पुंडगे, श्रीराम बळी, महादेव गायकवाड, प्रभाकर गायकवाड, हरिभाऊ गायकवाड, विठ्ठल कव्हर, शिवाजी काळे आदीं सह अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने पेरलेली बियाणे वाया गेले आहे. सदर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी जोर धरत आहे.

मंगळवारी सुमारे 2 वाजता पासून किन्ही घोड्मोड च्या शिवारात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि पाऊस एवढा जोरात होता की त्या पावसाचे पाणी हे अनेकांच्या घरात व दुधाळा व किन्ही घोडमोड येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये घुसले जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी सर्वांनी मिळून पाणी बाहेर काढले अनेक व्यक्तींच्या घरामध्ये घुसलेल्या पाण्याचा आढावा सरपंचांनी घेतला तसेच ज्या लोकांच्या पेरण्या सुरू होत्या त्या पेरणीवर जोरदार पाऊस झाल्या मुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. गावातील नदीचे पाणी हे पात्र सोडून अनेकांच्या शेतामध्ये घुसले व शेतातील माती खरडून वाहून नेली त्यामध्ये श्री विकास श्रीरंग सोळंके यांच्या शेतामध्ये संपूर्ण नदीचे पात्र वळल्याने त्यांच्या संपूर्ण पिकाचे तर नुकसान झालेच परंतु शेतातील सर्व माती वाहून गेली हे पाहण्यासाठी गावातील व मिर्झापूर येथील लोक मोठ्या संख्येने जमले होते तरी या झालेल्या नुकसानीचा पंचनामा शासनाने ताबडतोब करावा अशी गावकऱ्यांकडून मागणी करण्यात येत आहे व तसेच लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Share
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close