You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्राईम

अखेर तिसऱ्या दिवशी वाघी येथील पूजा बाळू पवारचा मृतदेह बोराळा धरणात जाळ्यात अडकला

स्थानिक मच्छीमार तरुणांच्या प्रयत्नांना यश

शिरपूर दिनांक ४ जुलै (प्रतिनिधी)

Active न्युज टीम

शिरपूर पासून जवळच असलेल्या वाघी बु येथील २ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान दोन शाळकरी बहिण-भाऊ कु. पूजा बाळू पवार वय १४ वर्षे व पारस बाळू पवार वय ८ वर्ष ही दोन्ही भांडे पुराच्या भयंकर पाण्यामध्ये वाहून गेल्याची ह्रदय  हेलवनारी दुःखद घटना घडली होती. दिनांक २ जुलै रोजी प्रशासनाच्या वतीने पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकास पाचारण करण्यात आले होते.

रात्री १२ वाजेपर्यत शोधमोहीम सुरू होती. पुन्हा 3 जुलै राजी सकाळपासूनच बचाव पथकाने शोध मोहीम सुरू केली होती. दरम्यान त्या दोन्ही भावंडांचा ५ वाजेपर्यंत थांगपत्ता लागला नव्हता.त्यानंतर स्थानिकांची शोध मोहीम सुरूच होती. सायंकाळी सव्वा सहा चे दरम्यान पारस बाळू पवार या चिमुकल्याचा मृतदेह सापडल्या गेला.नंतर तिसऱ्या दिवशी स्थानिक मच्छिमार तरुणांना कु.पूजा बाळू पवार हिचा मृतदेह जाळ्यात अडकलेला आढळून आला. त्यांनी मोठ्या हिमतीने टो बाहेर पडला याकरिता राहुल बाभने, महादेव बाभने, बाळू बाभणे यांनी परिसराम घेतले

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close