You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्राईममालेगाव

अखेर वाघी येथील पारस बाळू पवार याचा मृतदेह बोराळा धरणात आढळला

पूजा पवारच्या शोधासाठी बचाव पथकाची शोध मोहीम तीव्र

शिरपूर दिनांक 3 जुलै (प्रतिनिधी)

Active न्युज टीम

शिरपूर पासून जवळच असलेल्या वाघी बु येथील २ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान दोन शाळकरी बहिण-भाऊ कु. पूजा बाळू पवार वय १४ वर्षे व पारस बाळू पवार वय ८ वर्ष ही दोन्ही भांडे पुराच्या भयंकर पाण्यामध्ये वाहून गेल्याची ह्रदय  हेलवनारी दुःखद घटना घडली होती. दिनांक २ जुलै रोजी प्रशासनाच्या वतीने पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकास पाचारण करण्यात आले होते.

रात्री १२ वाजेपर्यत शोधमोहीम सुरू होती. पुन्हा 3 जुलै राजी सकाळपासूनच बचाव पथकाने शोध मोहीम सुरू केली होती. दरम्यान त्या दोन्ही भावंडांचा ५ वाजेपर्यंत थांगपत्ता लागला नव्हता.

सविस्तर वृत्त असे की दिनांक २ जुलै रोजी ही दुर्दैवी घटना घडली होती. नाला प्रक्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झाला त्यामुळे वाघी बु. येथील गावालगत असलेल्या नाल्याला भयंकर पूर आला होता. नाल्या वरून पाणी वाहत होते. “नाल्याला पूर आला असेल” म्हणून आपल्या धाकट्या भावास शाळेतून घरी आणण्यासाठी कु. पूजा गेली होती. आपल्या धाकट्या भावास घरी घेऊन येत असताना नाल्यावरील वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज चुकल्याने पाण्याच्या प्रवाहामध्ये सागर व नंतर कु.पूजा हे दोघेही वाहून गेले व इतर दोन मुले पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहत असताना येथील धाडसी तरुण सागर दत्ता खिल्लारे रा .वाघी व त्याचे मित्र यांनी आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्यामध्ये उडी घेतली व पंकज बाळू पवार व सौरभ राधेश्याम पवार या  दोन्ही मुलांचे प्राण वाचवले घडलेल्या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान बचाव पथकाची शोध मोहीम ५ वाजे पर्यंत सुरु होती. ५ वाजल्यानंतर शोध व बचाव पथक रिकाम्या हाती परत आले.  त्यानंतर स्थानिकांची शोध मोहीम सुरूच होती. सायंकाळी सव्वा सहा चे दरम्यान पारस बाळू पवार या चिमुकल्याचा मृतदेह सापडल्या गेला असून स्थानिक अजूनही पूजा बाळू पवार हिच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत.

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close