You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्राईमवाशिम

दोन शाळकरी मुले पुराच्या पाण्यात गेली वाहून!

वाघी बुद्रुक येथील दुर्दैवी घटना

शिरपूर दि. 2जुलै(प्रतिनिधी)

वाचवण्यात यश आलेल्या विद्यार्थ्यांचे नाव पंकज बाळू पवार नंबर 2 सौरभ राधे शाम पवार

शिरपूर पासून जवळच असलेल्या आसेगाव रोड वरील वाघी बुद्रुक येथील शाळकरी मुले नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची दुर्दैवी घटना दिनांक २ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.

शिरपूर व परिसरामध्ये पाऊस झाल्याने व नाला परी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने नाला ओथंबून वाहत होता शिरपूर पासून जवळच असलेल्या आसेगाव रोडवरील ग्राम वाघी बुद्रुक येथील चार शाळकरी मुले शाळेमधून घरी जात असताना नाल्याला एकदमच पाणी आल्याने त्या मुलांना पाण्याचा अंदाज चुकला चारही मुले नाल्याच्या खाली पाण्यामध्ये पडली त्यामधील दोन मुलांना ग्रामस्थांनी बाहेर काढले व मात्र पूजा बाळू पवार वय १४ वर्ष व तिचा भाऊ पारस बाळू पवार वय ७ वर्ष ही दोन्हीही बहीण भाऊ पाण्यामध्ये वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. पूजा हि आठव्या वर्गात  शिकत होती तर तर पारस हा दुसऱ्या वर्गात शिकत होता.  सदर नाल्यावर बांधलेल्या पुलावर कठडे नसल्याने सदर अपघात, दुर्घटना घडली असल्याचे ग्रामस्थांच्यावतीने बोलले जात आहे त्या दोन्ही मुलांना वाचण्यासाठी ग्रामस्थ शर्तीचे प्रयत्न करत होते. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पो स्टेशनचे पीएसआय राहुल गुहे घटनास्थळी पोहोचले असून पिंजर येथून रेस्क्यू टीम ला पाचारण करण्यात आले आहे.वृत्त लिही तोपर्यंत शोध मोहीम सुरू होती. मालेगावचे तहसीलदार रवी काळे साहेब यांनी पिंजर येथील  संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दीली आणी तात्काळ  सर्च ऑपरेशन करीता निघून येण्याचे सांगितले पथक प्रमुख दीपक सदाफळे आणी त्यांचे सहकारी  ऋषीकेश तायडे, महेश साबळे,राहुल जवके, मयुर जवके, गोविंदा ढोके आणी रेस्क्यु बोट, रुग्णवाहिका, शोध व बचाव साहित्यासह घटनास्थळी  रवाना  झाले आहे.

पूजा बाळू पवार वय १४
पारस बाळू पवार वय ७ वर्ष
Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close