You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
शिक्षण व नोकरी

इंग्रजी शाळांची इंग्रजा सारखी लूट

शिक्षणाच्या आयचा घो

प्रतिनिधी अजय बोराडे/

Active न्युज

मानवाचा सर्वांगीण विकास शिक्षणातून होतो. शिक्षणाची ही गंगा घरोघरी पोहचावी म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची 1919 मध्ये स्थापना केली.या घटनेस आता बरोबर शंभर वर्ष होत आहे. शतकानंतर या वाहत्या गंगेत हात धुऊन रयतेची लुट करण्याचे काम इंग्रजी शाळा चालक करत आहे.सिल्लोड तालुक्यातील शाळा ही यास अपवाद नाही. उदारीकरणानंतरच्या 25 वर्षानंतर शिक्षणाचे खासगीकरण व व्यापारीकरण झालं.स्पर्धेत आपला पाल्य टिकला पाहिजे,इंग्रजीची ओढ, शिक्षण म्हणजे इंग्रजी माध्यमचं या समजुतीने या मार्ग पालक निवडतात. सिल्लोड शहरात 21 इंग्रजी शाळा आहेत तर तालुक्यात ही संख्या 41 इतकी आहे.सुमारे 15 हजार विद्यार्थी यात शिकतात. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुलंच यात अधिक. या शाळांच्या प्रांगणात पाय टाकताच इकडे खिसा खाली तर तिकडे “गरम” व्हायला सुरुवात होते. काही शाळांचे नर्सरी चे  शैक्षणिक शुल्क 16 ते 17 हजार इतके प्रचंड आहे.तिसरी चे शुल्क 26 ते 28 हजार इतकं आहे.अनुदानित कॉलेज मध्ये 12 विचं शुल्क 3 ते 4 हजार तर याच विनाअनुदानित इंग्रजी शाळा पहिली साठी 22 हजार रु.आकारतात याचा अर्थ  बारावी पेक्षा पहिली महाग आहे. एका शाळेत नर्सरी च्या पुस्तकांचा संच 1900 रु.ला दिला जातो त्या तुलनेत 12 विची  पुस्तकं अवघी 600 रुपयात बाजारात उपलब्ध आहेत.पहिल्या वर्गाचा पुस्तक संच 3 हजारा पर्यंत आहे.ही पुस्तके, वह्या, इतर साहित्य, ड्रेस आता या शाळांतूनच खरेदी करण्याची सक्ती पालकांना करण्यात येते व शेकडो त्रस्त पालकांच्या या बाबत तक्रारी येत आहेत. एन. सी. ई. आर. टी. ची स्वस्त पुस्तकं न आणता खासगी महाग प्रकाशनांचे जास्त नफा देणारे साहित्य पालक नावाच्या ग्राहकाच्या माथी मारले जात आहे.50 टक्के नफा यातून मिळतो अशी माहिती एक पालक   पण एका इंग्रजी शाळेत नोकरीस असणाऱ्या व्यक्तीने दिली.700 रु. खरेदी असलेला ड्रेस  1300 ला विकला जातो अशी पुष्टी त्यांनी दिली. बहुतेक शाळांचे अंतर्गत कापड दुकान, पुस्तके वह्या ई. स्टेशनरी दुकान आहेत. एखाद -दोन शाळांनी बाहेर वेंडर ठेवलेत पण त्यातही हित संबन्ध असतातच. ड्रेस कोड च्या नावाखाली 300 रु खरेदीचे स्वेटर 600 रु. पर्यंत विकले जाते. थोडक्यात या शाळांमध्ये शिक्षण सोडलं तर सर्व मिळतं. यातून शासनाचा लाखो रु. जी. एस. टी. ही बुडतो. आमच्या शाळेची वार्षिक उलाढाल 5 कोटीच्या घरात आहे अशी माहितीही खासगीत सर्वात मोठया शाळेतील एका कर्मचाऱ्याने दिली.41 शाळांमधून 20 कोटींचा हा सर्व व्यवहार होत असावा. सुरुवातीला पालकांसमोर अडमिशनचा ‘फार्स’ पार पाडला जातो.आमच्या शाळेत एका वर्गात फक्त 30 विद्यार्थी असतात व प्रत्येकाकडे जातीने लक्ष दिले जाते असे सांगितले जाते.प्रत्यक्षात मात्र एकेका वर्गात 50 ते 55 मुलं असतात व यातून मुलांचा कोंडमारा तर वर्गाचा कोंडवडा होतो.सी. बी एस. ई., स्टेट बोर्ड याचा अर्थच बऱ्याच पालकांना शेवट पर्यंत कळतं नाही.जास्त विद्यार्थी,कमी जागा, कमी शिक्षक व कमी खर्च हे गणित या मागे असतं.राष्ट्रीय शिक्षण धोरणात अशी शिफारस आहे की 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असावा मात्र या धोरणाची इथे पायमल्ली होते.योग्य अहर्ता नसलेले शिक्षक उपलब्ध नसणे, कमी पगारी शिक्षक पगारा इतकेच शिकवण्याचे योगदान देतात.एका शाळेत मागील वर्षी 8 वीच्या वर्गाला गणिताचे 6 महिने शिक्षक नव्हते तो भार भूगोलाच्या शिक्षकाने वाहिला व पाल्यांच्या भवीतव्याचे गणितंच बिघडले अशी प्रतिक्रिया एका पालकाने दिली.शाळांमधील वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी, स्नेह संमेलन ,सहली यातून ही पालकांना चुना लावला जातो.शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकानांही ड्रेस कोड मध्ये गडवलं जातं. दुपटीने त्यांच्या कडून ड्रेस चे पैसे आकारले जातात.शुल्क निश्चिती व वाढी साठी कागदावरच ठराव घेतला जातो.प्रवासी समितीचे काम नावापुरते.2 वर्षा पूर्वी शहरात एका विद्यार्थ्यांस स्कुल बसचा अपघात होऊन प्राण गमवावे लागले होते. हे सर्व वर्षानुवर्षे सुरू आहे शहरातील व्यापाऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर शाळांमधून पुस्तकं व इतर साहित्य विक्री तात्काळ बंद करण्यात यावी असे पत्रक 2 जून रोजी गटशिक्षणाधिकारी यांनी काढले पण याचा शाळांवर कसलाही परिणाम झालेला दिसतं नाही.एव्हढं सर्व करूनही या शाळा दर्जेदार शिक्षण देऊ शकतं नाही ही खंत आहे.फक्त एकाच शाळेत मुलिंसाठी 50 टक्के शुल्क माफ आहे.  सद्याच्या इंग्रजी शाळा या लुटारु, बाजारू व खिसेकापू आहेत . प्रतिक्रिया– संदीप मोरे,एक पालक

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close