You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
आरोग्यवाशिम

शेलुबाजार येथे विजेच्या धक्क्याने पुन्हा एकदा वानराचा मृत्यू

नवनाथ गुठे / चोरद..

दिनांक..२९/०६/२०१९..

प्रतिनीधी… Active न्युज

चोरद येथुन जवळच असलेल्या शेलुबाजार येथे विजेच्या धक्क्याने पुन्हा एकदा वानराचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दिनांक २९ जुन.रोजी  सकाळी शेलुबाजार येथे एका वानराला विजेच्या जोरदार धक्का  लागला व ते वानर विजेच्या पोल वरून खाली पडले.  सदर माहिती वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टिम मंगरुळपीर शाखा वनोजा चे सदस्य आदित्य इंगोले यांना मिळताच ते तात्काळ त्यांचे सहकारी आकाश कांबळे यांच्या सोबत घटनास्थळी दाखल झाले. सदर वानर शेलुबाजार येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात असलेल्या विजेच्या पोलवर चढले होते. व तेव्हाच वीजप्रवाह सुरू झाला. त्यामुळे सदर वानराला विजेचा जोरदार धक्का बसला. यावेळी आदित्य इंगोले यांनी तात्काळ घटनास्थळी  जाऊन पाहणी केली. असता कि ते वानर जीवंत आहे का? पण तोपर्यंत खुप ऊशीर झाला होता. यानंतर याची माहिती कारंजा-मंगरूळपीर वन परिक्षेत्राचे वनधिकारी मा. श्री. अरविंद इडोळे व वाशिम जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक गौरवकुमार इंगळे यांना देण्यात आली. माहिती वरून वनोजा परिक्षेत्राचे वनरक्षक श्री. देवकाते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सदर घटनेचा पंचनामा केला. व नंतर टिम च्या सदस्यांच्या मदतीने माती देऊन माणुसकी चा परिचय करून दिला. यावेळी वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टिम मंगरुळपीर शाखा वनोजा चे आदित्य इंगोले, आकाश कांबळे, वैभव गावंडे तसेच वनविभागाचे वनरक्षक श्री. देवकाते व वनमजुर किसन राठोड उपस्थित होते.येत्या काळात विजेच्या धक्क्याने वन्यजीवांच्या मृत्यू मध्ये वाढ झाली आहे. दोन दिवसा आधी वनोजा येथे सुध्दा एक वानर विजेच्या धक्क्याने मृत झाले होते.आतायावर महावितरण काय उपाययोजना करतात जेनेकरून वानराचा विजेच्या धक्क्याने म्रूत्यु होणार नाही किंवा इतर अनेक अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाही यावर सुद्धा वन्यजीव प्रेमींचे लक्ष लागले आहेत.

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close