You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
महाराष्ट्र

संत निवृत्ती नाथांच्या पालखीचे राहुरीत ऊत्साहात स्वागत

राहुरी ( बद्रिश देहाडराय )

(प्रतिनिधी: Active न्युज)

राहुरी, ता.२८:

संत निवृत्ती नाथांच्या पालखीचे राहुरीत ऊत्साहात स्वागत झाले.पालखी सोहळ्यात  मोठी संख्या असलेल्या वारकऱ्यांची ठिकठिकाणी वाड्यावस्तीवर भोजनाची व निवासी व्यवस्था केली गेली.

पालखीचे पाण्याचे टाकीजवळ आगमन होताच तिचे फटाक्याची आतषबाजी करुन स्वागत केले. उपनगराध्यक्ष दिलीप चौधरी, आर. आर. तनपुरे,मुख्याधिकारी अनुप दुर्रे,अनिल कासार, हर्ष तनपुरे ,दशरथ पोपळघट आदींनी पालखीचे स्वागत केले. खंडेराय देवस्थान मंडळाचे अध्यक्षचाचा तनपुरे,सदाशिव शेळके, राजेंद्र वाडेकर ,दिलीप राका आदी पदाधिकारी यांनी पालखीचे स्वागत केले.सौ. भागीरथीबाई तनपुरे कन्या शाळेच्या प्रांगणात पालखीचा मुक्कामहोता. दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. सुनीलभुजाडी, जयहिंद माळी, दिनकर पवार,मधुकर पोपळघट, ताराचंदतनपुरे,डॉ. प्रभाकर उंडे आदीनी वारकऱ्यांची भोजनाची ,चहापानव्यवस्था केल्या. ग्रामस्थांनी जमा केलेल्या पोळ्या, भाकरी, आमटींचा आस्वाद वारकर्यांनी घेतला.विविध स्वंयसेवी संस्था, मंडळ यांनी ही वारकऱ्यां च्या व्यवस्था केल्या.वारकर्‍यांसाठी राहुरी येथील मराठा एकीकरण समिती व अ.भा. छावा संघटनेच्या वतीने मोफत औषधे,विविध आजारावरील गोळ्या व पाण्याचा बाटलीचे मोफत

वाटप करण्यात आले.  शहरात वारकर्‍यांची तोबा गर्दी झाली. या दिंडी सोहळ्यात वयोवृद्ध वारकर्‍यांचीही संख्या मोठी असते. यावर्षी मराठा एकीकरण समिती व अ.भा. छावा संघटनेच्या वतीने विविध आजारावरील गोळ्या व औषधे  मोफत वाटण्यात आली.  डॉक्टर्स अ‍ॅण्ड केमिस्ट पतसंस्थेचे नुतन अध्यक्ष सूर्यकांत भुजाडी यांच्या हस्ते औषधे वितरणाचा शुभारंभ झाला.  संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे,समन्वयक राजेंद्र लबडे, प्रवीण देशमुख, नवनाथ सप्रे, संदीप गाडे,शरद तनपुरे,सुभाष पवार,पिनुशेठ कटारे,जुनेद सय्यद, ऋषीकेश लबडे, किरण गागरे, शरद पुंड, विश्‍वनाथ ठोकळे, रमेश खंडागळे, रमेश शेजुळ, सुरेश जाधव, अविनाश क्षीरसागर, राहुल कसाब, मारूती लबडे,  मुखतार सय्यद,  आदींसह नागरिक उपस्थित होते.दिंडी सोबत जनकल्याणसमितीचे वैद्यकीय अधिकारी यांचेपथक होते.

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close