लघु व्यवसायिकांचा मुख्य कार्यकारी यांच्या दरबारात आर्त टाहो…
भूखंड व गाळे लघुव्यवसायिकांना वाटप करा, अन्यथा जन आंदोलन करू
शिरपूर :
शिरपूर ग्रामपंचायतीने वाटप केलेले भूखंड व गाळे प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात यावी व बस स्थानक परिसरातील भूखंड व गाळे लघु व्यवसायिकांना देण्यात यावे अशी मागणी येथील लघु व्यवसायिकांनी सीईओंकडे दिनांक ७ ऑगस्ट रोजी निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा जन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
येथील ग्रामपंचायतने मे २०२३ मध्ये ग्रामपंचायत परिसरातील काही जागा बेकायदा प्रक्रिया राबवून मर्जीतील लोकांना भाडेपट्ट्या द्वारे दिल्या ग्रा.पं. सरपंच व तत्कालीन सचिव यांनी संगमत करून कुठल्याही प्रकारचा लिलाव न करता व गावामध्ये दवंडी न देता कागदोपत्री लिलाव दाखवून भुखंड व गाळे वाटप करण्यात आले कारण आम्ही दिवस भर ग्रा.प.परिसरातच राहतो आम्हाला कसे कळले नाही? कधी दवंडी दिली?, कधी लिलाव झाला?, कधी कोणती सभा झाली? कारण तीन महिन्यापूर्वी असा कुठलाही लिलाव किंवा नोटीस बोर्डवर नोटीस लावण्यात आलेली नाही त्यामुळे सदर लिलाव हा बनावट असून तो रद्द करण्यात यावा व भूमी अभिलेख कार्यालयाकडून सदर जागेची मोजणी करून, पुन्हा लिलाव करण्यात यावा किंवा भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया करण्यात यावी. लघु व्यावसायिक बसस्थानक परिसरामध्ये या जागेवर मागील २० ते ३० वर्षापासून छोटे छोटे तीन शेडचे खोके टाकून व्यवसाय करतात व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. लघुव्यवसाइक वर्षानुवर्षे व्यवसाय करत असल्याने लघु व्यवसायिकांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे. असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र ग्रामपंचायत ने केलेल्या कागदपत्री लिलावामध्ये नाममात्र अनामत रक्कम घेऊन ग्रामपंचायतचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच सचिवांनी काहीतरी आर्थिक प्रलोभनाला बळी पडूनच हे अनधिकृत पणे केलेले हे लिलाव व भाडेपट्टे रद्द करण्यात यावे व येथील लघु व्यवसायिकांना प्राधान्य क्रमाने हे भूखंड व गाळे वाटप करण्यात यावे अशी मागणी लघुव्यवसायिकांच्या वतीने दिनांक ७ ऑगस्ट रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी वाशिम यांना निवेदनाद्वारे केली आहे.
प्रशासनाने या बाबीची दखल न घेतल्यास जन आंदोलन करावे लागेल असाही इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर गणेश भंगी, उत्तम चंद्रशेखर, राजू लहामगे, अनिकेत मारवाडी, रवीसिंग ठाकूर, भिवा चोपडे, गजानन भंगी, शेख रफीक शेख इस्माईल, अंकुश बोबडे, अशोक बोराटे, गजानन देवराव देशमुख, श्रीराम हजारे, उत्तम मारवाडी, विजय तायडे, शिवाप्पा गाडे, अक्षय बाभणे, संतोष देशमुख, गणेशसिंग चव्हाण, अनिकेत मारवाडी, गोलू आंबटवार, नरेश भालेराव ,शिवानंद आंबटवार, दिनकर शिंदे, लक्ष्मण परिहार, वैभव पवार, आदी लघु व्यावसायिकाच्या निवेदनावर सह्या आहेत.