You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
महाराष्ट्र

सिल्लोड तालुक्यात गेल्या सहा दिवसात सरासरी 103 मिमी पाऊस

सिल्लोड, प्रतिनिधी :

अजय बोराडे:

Active न्युज

तालुक्यात गेल्या सहा दिवसात सरासरी 103 मिमी पाऊस झाल्याने 21 गावांचा पाण्याचा प्रश्न तुर्तास मार्गी लागला आहे. यामुळे 21 गावातील 39 टैंकरची चाके थांबली आहेत. यामुळे प्रशासनासह लोकप्रतिनिधींना काहीसा दिलासा मिळाला आहे. आठवडाभरा पूर्वी तालुक्यातील 101 गावांना 202 टैंकरने पाणीपुरवठा केला जात होता.

गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने तालुक्यात दिवाळीपासूनच पाणीबाणी निर्माण झाली होती. यामुळे तब्बल 101 गावांना 202 टैंकरने पाणीपुरवठा केला जात होता. तालुक्यात पहिल्यांदाच टैंकरने द्विशतक गाठले. शिवाय जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ही बिकट झाला होता. त्यात यंदा ही मान्सून लांबल्याने मृग नक्षत्र कोरड गेला. यामुळे प्रशासन, लोकप्रतिनिधीसह शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. परंतु आर्दा नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाचे तालुक्यात आगमन झाले. शनिवार, रविवार व सोमवार असा सलग तीन दिवस पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीपाची केली. त्यानंतर ही सलग तीन दिवस पाऊस झाल्याने पावसाने शेतकऱ्यांना सुखद दिलासा दिला.

गेल्या सहा दिवसात शिवणा, गोळेगाव, धोत्रा परिसारात चांगला पाऊस झाला. यामुळे या परिसरातील शिवणा, मुकपाठ, डिग्रस, खंडाळा, सराटी, गोळेगाव, पानस, मोढा, धोत्रा, बोदवड आदी 21 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तुर्तास मार्गी लागल्याने 39 टैंकरची चाके थांबली आहेत. शिवाय रिते असलेल्या जलसाठ्यात पाण्याची आवक सुरु झाली आहे.

तालुक्यात लहान- मोठी 80 हजारापेक्षा अधिक जनावरे आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला होता. या पावसामुळे पाण्याचा प्रश्न तुर्तास मार्गी लागला असला तरी चाऱ्याचा प्रश्न मात्र जैसे थे आहे.

तालुक्यात सरासरी 103 मिमी पाऊस

तालुक्यात सहा दिवसात 103 मिमी पाऊस झाला. यात सर्वाधिक पाऊस गोळेगाव मंडळात 200 मिमी झाला आहे. त्या खालोखाल अंभई मंडळात 150, सिल्लोड 131, अजिंठा 106, आमठाणा 92, बोरगाव बाजार 63, भराडी 58, तर सर्वाधिक कमी पाऊस निल्लोड मंडळात 24 मिमी झाला आहे.

Share
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close