तबरेज अन्सारी यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या..
मुस्लिम युवा मंचाच्या वतीने सिल्लोड शहर बंद ठेऊन केली मागणी
सिल्लोड, प्रतिनिधी :
अजय बोराडे:
Active न्युज: तबरेज अन्सारी यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी मुस्लिम युवा मंचाच्या वतीने सिल्लोड शहर बंदची हाक देण्यात आली होती. शहरातील व्यापाऱ्यांनी बंदच्या हाकेला समिश्र प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली. दरम्यान एका दुकानदारात व मंचाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने या बंदला गालबोट लागले.
तबरेज अन्सारी यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी मुस्लिम युवा मंचाच्या वतीने शुक्रवारी सिल्लोड शहर बंदची हाक देण्यात आली होती. दुपारी 2 वाजेनंतर मुस्लिम युवा मंचाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार रामेश्वर गोरे यांना निवेदन देण्यात आले. या
मोर्चात मुस्लिम युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या दरम्यान मुख्य रस्त्यावरील भगतसिंग चौकातील संगीता जनरल स्टोअर्सचे मालक शशिकांत कोलते व मोर्चातील चार- पाच जणांमध्ये दुकान चालु ठेवण्याच्या कारणावरुण शाब्दिक चकमक झाली. यामुळे थोडा वेळ तणाव निर्माण झाला होता. या संधर्भात पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या प्रयत्नाना यश आले नाही. शशिकांत कोलते यांनी शहर पोलिस ठाण्यात अखेर फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरुण अनोळखी चार- पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती राजेंद्र बोकडे यांनी दिली.