You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
वाशिम

विजेच्या धक्क्याने माकडाचा मृत्यू

चोरद येथुन जवळच असलेल्या वनोजा येथील घटना

नवनाथ गुठे/ चोरद

दिनांक..२७/०६/२०१९..

Active न्युज टीम

चोरद येथुन जवळच असलेल्या वनोजा येथे आठवडाभरा पुर्वी याच ठिकाणी एका माकडाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. त्या घटनेला काही दिवसांचा अवधी नाही होत तो पुन्हा त्याच ठिकाणी दुसऱ्या माकडाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. आज वनोजा येथे वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टिम मंगरुळपीर शाखा वनोजा चे सदस्य आदित्य इंगोले यांना हे माकड दिसले त्यांनी घटनेची माहिती लगेच कारंजा-मंगरूळपीर वन परिक्षेत्राचे वनाधिकारी मा. श्री. अरविंद इडोळे तसेच वाशिम जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक गौरव कुमार इंगळे यांना दिली. माहिती वरून वनविभागाचे वनरक्षक श्री. देवकाते व वनमजुर राहुल जाधव घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. नंतर वीजप्रवाह बंद करून त्या माकडाला टिम च्या सदस्यांच्या मदतीने खाली काढण्यात आले. व नंतर माती देऊन माणुसकी चा परिचय करून दिला. यावेळी वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टिम मंगरुळपीर शाखा वनोजा चे वैभव गावंडे ,ओम टोंचर, गजानन पानभरे ,तसेच वनविभागाचे वनरक्षक श्री. देवकाते ,व वनमजुर राहुल जाधव ,आदि उपस्थित होते. सदर झाडाच्या फांद्या विद्युत तारांच्या बाहेर निघाल्या त्यामुळे सदर अपघात या ठिकाणी घडले आहे. आठ दिवसातील हि दुसरी घटना आहे.तरिसुध्दा महावितरनने या ठिकाणी पाहणी करून ज्या झाड्यांच्या फांद्या विजेच्या तारेला स्पर्श करून बाहेर गेलेल्या आहेत त्या झाडाच्या फांद्या तोडुन पुन्हा अशी घटना घडु नये किंवा एखादी जिवीतहानी होऊ नये या सर्व बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्यावा व समस्या निकाली काढण्यात यावी अशी मागणी वन्यजीव प्रेमी करित आहेत.

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close