श्री जानगीर महाराज संस्थान व मिर्झा आमानुल्ला शहा दर्गा शिरपूर येथील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक
शिरपूर जैन ही संतांची भूमी म्हणून शेकडो वर्षांपासून प्रसिद्ध आहे
हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेले निसर्ग रम्य वातावरणातील जानगीर महाराज संस्थान व मिर्झा मिया दर्गाह हिंदू मुस्लिम वासियांचे आराध्य दैवत आहे
शिरपूर जैन येथील श्री जानगीर महाराज संस्थान हे शिरपूर वासियांबरोबर पंचक्रोशीतील भाविकांचे आराध्य दैवत व निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे .
येथे हजारो भक्तगण व पर्यटक संपूर्ण भारतामधून येतात त्यामुळे शिरपुरात नेहमीच भक्तांची व पर्यटकाची गजबज असते
या सस्थानला 400वर्षाची परंपरा लाभलेली आहे पूर्वी येथे घनदाट जंगल होते तेथे जणगिर महाराजाचे वास्तव्य होते ते तप साधना करायचे
असा इतिहास आहे
महाशिवरात्रीचा उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो. भंडार्याच्या महाप्रसादाचा नैवद्य मिर्झा बाबा येथे नेल्या जातो नंतरच महाप्रसादाचे वाटप करण्यात येते अशी हिंदू मुस्लिम एकतेची शेकडो वर्षाची परंपरा आजही कायम आहे येथे नेहमीच दैनंदिन धार्मिक कार्यक्रम सुरू असतात वर्षभर येथील वर्दळही भाविकांच्या भावनेचे कायम असते. शिरपूर संतभूमी संतांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली आहे. आज है निसर्गरम्य ठिकाण म्हणून सुद्धा उदयास आले आहे तत्कालीन संत संस्थांनचे पहिले मठाधिपती प.पू. जानगीर महाराज हे चिंचेच्या झाडाखाली बसून तपश्चर्या करायचे मात्र जानगीर महाराज कुठून आले कसे आले हे कोडे कायम आहे. त्यांच्या समकालीन त्यांचे परम मित्र मुस्लिम संत मिर्झा अमानुल्ला शहा हे बेलाच्या झाडाखाली वास्तव्य करायचे. गावाच्या पूर्वेस संत जानगीर महाराजांचे वास्तव्य तर पश्चिमेस मिर्झा मीयांचे वास्तव्य होते. असे दोन्ही संत एकमेकांचे चांगले मित्र होते. त्याचेच उदाहरण घेत व त्यांच्या मैत्रीचे दाखले घेत हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक मानले जाते. जानगीर महाराज संस्थान येथे दैनंदिन काकड आरती, पारायण हरिपाठ, भजन, आरती आदि कार्यक्रम होत असतात. तर सोमवार, गुरुवार येथे नियमित अन्नदान होत असते. अन्नदान करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने सोमवार, गुरुवारी ऐवजी मधला कुठलाही दिवस घेणे येथे भाविक श्रेष्ठ समजून अन्नदान करतात. मंदिराचा परिसर मोठा असून मंदिरास शेती, बगीच्या, तळे आदींचे सानिध्यात चिंचेचे मोठमोठे वृक्ष आहेत, तर येथे संस्थांनचे दुसरे मठाधिपती परमपूज्य शिवगिरी बाबा यांचे मंदिर आहे. तर तिसरे मठाधिपती ओमकार गिर महाराज यांचे मंदिर सिद्धेश्वराचे पुरातन मंदिर तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर, कृष्ण मंदिर, गजानन महाराज मंदिर देखील आहे तर औदुंबराखाली दत्ताचे वास्तव्य आहे. सभामंडप, अन्नपूर्णा भवन, भक्त निवासाची सुविधा येथे आहे. सध्या संस्थांचे चौथ्या मठाधिपती महेश गिरी महाराज हे येथील मठाधिपतीआहेत संस्थांनवर जानगीर महाराज यांचा प्रगट दिन म्हणून महाशिवरात्रीला मोठा महाप्रसाद होतो. जवळपास एक लाख भाविक मोठ्या श्रद्धेने महाप्रसादाचा लाभ घेतात तर शिवगिरी बाबा यांची पुण्यतिथी महोत्सव डिसेंबर ते जानेवारी महिन्यात दरम्यान होतो या वेळी जवळपास चाळीस ते पन्नास हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात तर जुलै ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान ओमकार गिरी महाराज यांची पुण्यतिथी साजरी होत असते यावेळी देखील जवळपास 30 ते 40 हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात महाराष्ट्रातील विविध शहरांतील गावातील भाविक येथे दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने येऊन कार्यक्रमात मोठ्या तन-मन-धनाने सहभाग नोंदवतात मालेगाव तालुक्यातील शिरपूर हे संत भूमी महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे