You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
वाशिम

एका दिवशी तब्बल ५ सापांना जीवनदान

सर्पमित्रांनचे कौतुकास्पद कार्य

नवनाथ गुठे / चोरद..

दिनांक..२६/०६/२०१९..

प्रतिनीधी/Active न्युज

वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील घटना सध्या पाऊस पडला पण वातावरणात उकाडा मात्र कायम आहे. पावसाळ्याला सुरूवात झाली व त्यामुळे साहजिकच सापांचा वावर वाढतोय व साहजिकच आहे. कारण पावसामुळे त्यांचे बिळ हे बंद झालेत. त्यामुळे त्यांना बाहेर वावरण साहजिकच आहे. अशातच ते मनुष्य वस्तीत सुध्दा येत आहेत. काल रोजी मंगरुळपीर येथे तब्बल ५ सापांना जीवनदान देण्याच कार्य वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टिम मंगरुळपीर च्या सर्पमित्रांनी केले आहे. सर्वप्रथम काल संध्याकाळी समर्थ आॅटोमोबाईल च्या बाजुला मानोली रोड वर रात्री ९ वाजता एक साप मानद वन्यजीव रक्षक गौरवकुमार ईंगळे यांना दिसला असता सर्प मित्र गौरवकुमार ईंगळे व सुबोध साठे यांनी त्या विषारी कोब्रा सापाला शिताफीने यशस्वी पकडले व त्या कोब्रा सापाबददल माहिती दिली व वनक्षेत्र विभागात सोडून दिले व  त्यानंतर शिवाजी नगर मधुन सर्पमित्र शुभम ठाकुर यांनी कवड्या बिनविषारी जातीचा साप पकडला व जंगलात सोडत जीवनदान दिले.नंतर मंगरुळपीर येथे सर्पमित्र शरद दंडे यांनी रात्री ९:३० वाजता व सर्पमित्र सुबोध साठे यांनी लक्ष्मी विहार काॅलनी मंगरुळपीर प्रत्येकी एक असे २ पाणदिवड साप  रात्री १० वाजता सुरक्षिततरित्या पकडले. त्यानंतर आज सकाळी सोनखास मधुन धामण बिनविषारी जातीच्या सापाला २६ जुनला सकाळी ११ वाजता गौरव कुमार इंगळे व सुबोध साठे यांनी सुरक्षिततारित्या पकडुन जंगलात सोडत जीवनदान दिले. अशा प्रकारे एका दिवशी तब्बल ५ सापांना मानद वन्यजीव रक्षक गौरवकुमार ईंगळे यांच्या मार्गदर्शनात व ऊपस्थीत असताना अश्या प्रकारे सर्व एकुणच विविध प्रकारच्या ५ सापांना जीवनदान देण्याचे कौतुकास्पद कार्य मंगरुळपीर येथील सर्प मित्रांनी केलेले आहे.

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close