You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
महाराष्ट्रलाईफस्टाइल

जीवनात यशस्वी होण्यासाठी आऊट ऑफ फोकस जाऊन विचार केली पाहीजे-बुलबुले

राहुरी येथे व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न

बद्रिश देहाडराय ,

राहुरी/ दि 25 जून 2019

Active न्युज

जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी आऊट ऑफ फोकस जाऊन विचार व कृति केली पाहीजे़ आपण जीवनासाठी घातलेले बांध विकासाला मारक असून त्यापलिकडे जाऊन काम केले तर एक वेगळा व्यक्तीमत्वाचा ठसा उमटतो असे प्रतिपादन यशदाचे ट्रेनर विठठल बुलबुले यांनी केले

येथील राजमाता जिजाऊ पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत बुलबुले मार्गदर्शन करीत होते

पुढे बोलतांना विठठल बुलबुले म्हणाले की जीवनात प्रगती करायची असेल तर चौकट मोडली पाहीजे चौकट मोडणारे कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होतात प्रत्येकाने बॉस होण्यापेक्षा लिडरची भुमिका बजावली पाहीजे. मानसन्मान कामातून मिळत असतो त्यादृष्टीकोनातुन प्रत्येकाने काम केले पाहीजे असे ते बोलतांनी म्हणाले .

यावेळी कार्यक्रमाचे  प्रास्ताविक राहुरी तालुका राजमाता जिजाऊ पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ़भाऊसाहेब येवले यांनी  केले़

कार्यक्रमास उपाध्यक्ष शरद निमसे,संचालक दिपक बोरा,कारभारी फाटक,मनिषा मुळे,शैलजा सरोदे,सुचेता कुलकर्णी,रूपाली आळपे,मीना येवले,ऋषीकेश येवले,सुनिल भोेंगळ,उत्तम तारडे,नंदा वराळे,सुरेखा सांगळे इत्यादी मान्यवर उपस्थीत होते.

 

Share
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...
Tags
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close