You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
आरोग्यवाशिम

सर्पदंश : बचाव व उपाय – सर्पअभ्यासक :गौरवकुमार इंगळे, मंगरुळपीर.

सर्पदंश बाबत आपल्याला दैववादी होऊन चालणार नाही

नवनाथ गुठे/ चोरद..

दिनांंक..२३/०६/२०१९..

प्रतिनिधी: Active न्युज

पाऊस पडायला सुरुवात झाली आहे,साप हा शितरक्ती  सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी एक आहे. सापाच्या शरीराची उष्णता ही naturally maintain होत नाही.कारण सापाला घाम येत नाही. अशात पाऊस पडल्यानंतर जमिनीची गरम वाफ बाहेर पडते तसेच जमिनीत असणारे जीव बाहेर येतात.. खास करून सापाला शरीरातील उष्णता वाढू नये म्हणून थंड  जागेच्या शोधात ते चुकून मानवी अधिवासात शिरतात(कधी कधी मादीच्या किंवा भक्षाच्या शोधात सुद्धा)

साधारणपणे ग्रामीण भागात राहणारे लोक रात्री जमिनीवर गादी वगैरे टाकून झोपणे पसंत करतात.आपल्या भागातील प्रमुख चार विषारी सापांपैकी मण्यार आणि नाग हे न्यूरोटॉक्सिक आहेत.. त्यापैकी मण्यार हा cold poison म्हणून ओळखल्या जातो(त्याचे कारण की मण्यार सापाचा दंश झाल्यावर बहुतेक वेळी patient ला जाणवत नाही. मण्यार साप हा प्रामुख्याने निशाचर तसेच किटभक्षी असल्याने रात्रीच्या अंधारात किडे खाण्यासाठी फिरतो. अशाच परिस्थितीत तो घरात शिरतो.गाढ झोपेत असताना मण्यार चा दंश जाणवत नाही,कारण

*या सापाचे दात हे अन्य विषारी सापांपेक्षा लहान असतात.

* विष हे नागाच्या विषापेक्षाही तीव्र असते

*बहुतेकदा हा साप चावल्यानंतर दंश झालेल्या ठिकाणी जळजळ किंवा सुजंण येत नाही. त्यामुळेच हा साप चावल्यानंतर याचं विष केंद्रीय मज्जासंस्थेवर affect करते व तोपर्यंत patient ची डोळे जड होणे,छाती दाटून येणे इत्यादी  लक्षणे दिसतात.

त्यामुळे आपल्या भागातील विषारी सापांपैकी मण्यार हा साप जास्त dangerous आहे असे मला वाटते.

या परिस्थितीत दंशबाधित व्यक्तीला धीर देणेच गरजेचे ठरते. कुठलीही आवळपट्टी बांधणे किंवा चिरे देणे(चिरे देणे ही प्रथमोपचाराची वैज्ञानिक पद्धत नाही,तरी काही विशेष परिस्थितीत तज्ञाच्या सल्ल्याने हा प्रयोग केला जाऊ शकतो).

मण्यार सापापासून बचाव संदर्भात

रात्री घरात झोपण्यापूर्वी दरवाज्याच्या सर्व फटी तसेच फ्लोअरिंग व दरवाज्याच्या मधातील फट बुजवावी..

आपला परिसरात स्वच्छता राखणे आवश्यक,परंतु ग्रामीण भागातील हिरवळ लक्षात घेता हे बर्याच ठिकाणी शक्य होत नाही

साप खरबड जागेवर जास्त  सहजपणे सरपटतो, भिंतीवर चढणारा बिनविषारी असलेला कवड्या साप हा मण्यार सापाचे  खाद्य आहे घरातील जुन्या भिंतीची छपाई करून घ्यावी, जेणेकरून  भिंतींच्या फटीमध्ये साप शिरणार नाही,यासाठी कुडाची भिंत असल्यास शेण, माती सहज उपलब्ध होते.

तसेच ज्या घरांचा पाया load bearing म्हणजेच मोठ्या दगडांचा असतो त्या पायव्यात साप सहज शिरतात व वास्तव्य सुद्धा करू शकतात कारण यामध्ये पाली,उंदीर हे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे त्या पायव्या ला ही व्यवस्थित   बुजवून घ्यावे

घराचे छत टिनाचे असल्यास टिनाच्या खालच्या नळीतून साप घरात शिरण्याची शक्यता असते. त्यामुळे तेही व्यवस्थित कापड किंवा शेणमातीने बुजवून घ्यावे.

आपल्या भागात शेतिच्या मशागतीसाठी शेतांचा धुरा पेटवून देण्याच्या पद्धतीमुळे मोठ्या प्रमाणात सरीसृप यांचा अधिवास नष्ट होतो

पाऊस आल्यानंतर नालीमध्ये पाणी overfolw होत असते अशात हे पाणी बाथरूम मधील आउटलेट मधून घरात शिरते तसेच या पाण्यात वाहून येणारे किंवा पाण्यातील अधिवास असलेले साप सुद्धा घरात शिरल्याचे आम्ही अनेक ठिकाणी पाहले आहे, त्यामूळे सर्व आउटलेट बारीक जाळीने पॅक करावेत.

अनेक दिवस दगड विटांचा ढीग एकाच ठिकाणी पडून राहू1देऊ नये त्यामध्ये कीटक,पाली इ. चे वास्तव्य होऊन सापाला लपण्यासाठी चांगली जागा उपलब्ध होते.

या काही गोष्टी आपण प्रामुख्याने काळजी म्हणून करून घेऊ शकतो .

आपल्या भागात प्रामुख्याने आढळणारा दुसरा न्यूरॉटॉक्सिक साप म्हणजे नाग(common Cobra)

हा साप डिवचले गेल्यास फणा उभारतो तसेच एक बचावात्मक पवित्रा दाखवतो ,अनेक वेळा हा साप  स्वतःला वाचविण्यासाठी हा साप त्याचे जबडा(labials) समोरच्या व्यक्तीवर किंवा वस्तूवर आदळतो, म्हणजे तो प्रत्येकवेळी चावतोच असे नाही..हा त्याचा बचावात्मक पवित्रा असतो.

अनेकवेळा साप चावल्यानंतर  dry bite असतोम्हणजे साप चावतो खरे परंतु विष सोडत नाही, एका अभ्यासानुसार नागाचे 60 ते 70 टक्के चावे हे कोरडे(dry bite)असतात

साधारणतः नाग चावल्यानंतर जळजळ किंवा सुजण होते अलिकडल्या काळात नागाच्या चाव्यानंतर नेक्रोसिस चे ही लक्षणे काही केसेस मध्ये आढळून आले आहेत सायटोटॉक्सिक हा प्रकार आढळून आला आहे.

परंतु सामान्यतः नाग हा दिसायला फार आक्रमक असला तरी त्याची लक्षणे लगेच आढळून येतात*

आपल्या भागात आढळणाऱ्या प्रमुख4 विषारी सापांपैकी 3 रा म्हणजे घोणस साप(Russells viper snake).

घोणस हा विषारी आहे आकारमानाने या सापाचे दात हे मोठे असले तरी ते फिक्स नसतात

..आवश्यकते नुसार ते पुढील बाजूस करून चावा घेतो.

त्यामुळेच बहुतेक वेळी या सापाचे scratch bite असतात

या सापाच्या विषाची घनता जास्त असते

कुठलाही साप चावल्यानंतर त्याचे विष थेट रक्तातच जाते असे नाही

परंतु असा कुठलाही साप अस्तित्वात नाही जो पाणीही मागू देत नाही

4था  विषारी साप आहे फुरसे (saw scaled viper)हा साप हेमोटोक्सिक प्रकारात मोडत असून यामुळे मृत्यूच्या घटना क्वचितच घडतात.

आपल्या भागात(मंगरुळपीर, मानोरा परिसरात)याचे अस्तित्व फारसे नाही. शरीराच्या आकारमानाने याचे दात लांब असतात.

वॉर उल्लेख केलेल्या चार सापांच्या प्रजातीव्यतिरिक्त काही निमविषारी साप सुद्धा आपल्या परिसरात आढळतात उदा. इंडियन एग इटर साप, हरणटोळ साप इ.

उर्वरित कवड्या, धामण, तस्कर, वाळा, कुकरी, डुरक्या घोणस, मांडूळ इ. सापांचा समावेश बिनविषारी जातीमध्ये होतो….

मानव साप संघर्षातून केवळ पर्यावरणाचे व मानव जातीचे नुकसानच आहे,आता गरज आहे ती या घटकांना समजून मानव वन्यजीव  सहजीवनाचा  संकल्प करण्याची.

9860453242

7768868338

………Wildlife Conservation Team Mangrulpir

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close