You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
शिक्षण व नोकरी

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाची यशाची परंपरा कायम

इयत्ता ५वी च्या प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेत नेत्रदिपक यश

राहुरी : बद्रिश देहाडराय

प्रतिनिधी: Active न्युज

महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या वतीने चालवले जात असलेले  सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इयत्ता ५वी च्या प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेत नेत्रदिपक यश संपादून आपली यशाची परंपरा कायम ठेवली आहे.

इयत्ता ४वीच्या प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेस विद्यालयातील १०२ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी तब्बल ५३ विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षा उत्तीर्ण झालेले आहेत.  तर एकुण ९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे. राहुरी तालुक्यामध्ये ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्तीच्या एकुण १२ जागापैकी ९ जागा सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाने पटकावल्या आहेत. त्यात अार्य संजयकुमार कुलकर्णी हा २६४ गुण मिळवुन ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती परिक्षेत जिल्ह्यात प्रथम आला आहे. तसेच  पार्थ प्रदीप कराळे याला २४८,  सिद्धी रविंद्र भिंगारदे हिला २४०, सुचित गोविंद तागडे याला २१६, श्रेयस शिवाजी नवाळे याला २१२, सत्यजित अनिल शिरसाठ याला २१०, गिरीजा ऋषिकेश कुलकर्णी हिला २०६, धनश्री अविनाश मोरे हिला २०४ व  अपुर्वा विलास आवारी हिला २०४ गुण प्राप्त झालेले असुन, गुणवंत विद्यार्थ्यांनी शासकीय शिष्यवृत्ती प्राप्त केलेली आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे विद्यालयातील शिक्षक  पी. एस. शिंदे,  के. के. पवार, बी. डी. पवार व  विलास देशमुख यांचे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. के. पी. विश्वनाथा, सभापती डाॅ. ए. एल. फंरादे, सचिव डाॅ. अार. एस. वाघ, शिक्षण मंडळाचे सर्व संचालक,  यांच्यासह पालकांनी अभिनंदन केले आहे.

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close