महाराष्ट्र

सत्यशोधक समाजाच्या तालुकाध्यक्षपदी दिपक काळे यांची निवड

सत्यशोधक समाजाच्या तालुकाध्यक्षपदी दिपक काळे यांची निवड

0 0 6 4 5 6
[wonderplugin_carousel id="1"]

शिरपूर :
सामाजिक चळवळीची मातृसंघटना असलेल्या आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या मालेगाव तालुकाध्यक्षपदी शिरपूर येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते दिपक विलास काळे यांची निवड करण्यात आली आहे.
शिरपूर येथील संत सावता महाराज मंदिराच्या सभागृहात दि. 20 फेब्रुवारी रोजी बैठक पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानी जेष्ठ विचारवंत तथा पत्रकार कैलास भालेराव हे होते. यावेळी सत्यशोधक समाजाचे विभागीय सचिव प्रल्हाद पौळकर जिल्हाध्यक्ष गजानन धामणे, जिल्हा संघटक प्रा. अनिल बळी, जेष्ठ विचारवंत मुख्याध्यापक आर डी आरु, रिसोड तालुकाध्यक्ष भगवान भांदुर्गे, पत्रकार गजानन देशमुख, पत्रकार गोपाल वाढे, बंडू चोपडे, प्रबळ पौळकर आदींची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी सत्यशोधक समाजाचे जिल्हाध्यक्ष गजानन धामणे यांनी नियुक्तीपत्र देऊन काळे यांची निवड केली. यावेळी तालुका उपाध्यक्ष पदी दिपक लक्ष्मण भांदुर्गे यांनाही नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.

सत्यशोधक समाजाला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. या माध्यमातून संघटन बांधणीवर भर दिला जात आहे. विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविले जात आहेत.
यादृष्टीने मालेगाव तालुक्यात संघटन बांधणीसाठी काळे यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीत प्रल्हाद पौळकर यांनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची माहिती दिली. प्रा. अनिल बळी यांनी आजघडीला सत्यशोधक समाजाच्या विचारांची नितांत गरज असल्याचे सांगितले. आरु यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून त्यांच्यावर प्रदीर्घ पोवाडा लिहिणाऱ्या क्रांतिसूर्य महात्मा फुले यांचे विचार युवकांनी आत्मसात करण्याचे आवाहन केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष गजानन धामणे यांनी सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा उद्देश सांगून दीडशे वर्षांच्या वाटचालीचा आढावा विषद केला. आणि सत्यशोधक समाजाचे विचार युवकांनी घराघरात पोहोचावे असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणातून कैलास भालेराव यांनी सत्यशोधक विचारांची कृतीतुन अंमलबजावणी करण्याची गरज विषद केली.

यावेळी नियुक्ती संदर्भात बोलतांना दिपक काळे म्हणाले की, क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांचे विचार सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे.
तसेच लवकरच तालुका कार्यकारिणीचे गठन करुन संघटन बांधणी करणार असल्याचे सांगितले.
यावेळी नागेश भालेराव, सचिन मानवतकर, कैलास चांगाडे, वैभव गाभणे, शुभम भालेराव, रामा भालेराव, विशाल चोपडे, अनिल गाभणे, संतोष गवळी, लखन वंजे, निखिल इरतकर, गोपाल चोपडे, दुर्गेश मगर, नंदू खडसे, गणेश गाभणे, नितेश उल्हामाले, राजू कदम, सुनील गाभणे आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 4 5 6
[wonderplugin_carousel id="1"]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे