You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
महाराष्ट्रमालेगावलाईफस्टाइलशिक्षण व नोकरी

खासगी कॉन्व्हेंट मधील लूट थांबवण्याकरिता निवेदन

शेतकरी स्वाभिमानी संघटना चा इशारा

प्रदीप सावले

(प्रतिनिधी: Active न्युज)

मालेगाव :-

मालेगाव :- सध्या सर्वत्र शाळा सुरू होण्याची वेळ असून मालेगाव शहर आणि तालुक्यातील कॉनव्हेेंट वाल्यांनी शाळा सोडून दुकानदारी सुरू केल्या मुळे ही दुकानदारी थांबविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे निवेदन देऊन ही दुकानदारीत न थांबल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे .

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी  पंचायत समिती मालेगाव चे गटशिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की सध्या सगळीकडे शाळा सुरू  होण्याची वेळ आहे एकीकडे शेतकरी बांधवांना पेरणीची लगबग सुरू असताना दुसरीकडं आपल्या पाल्यांना शाळेत घालण्याची त्यांना या पुस्तक खरेदी करण्याची एकच वेळ आली आहे मात्र तालुका व शहर विशेषता शहरातील काही कॉनव्हेेंट वाल्यांनी याची दुकानदारी सुरू करतात

स्वतजवळून पुस्तके पेन्सिल दप्तर बूट घेण्याची सक्ती केली आहे तर काही कॉन्व्हेंट वाल्यांनी विशिष्ट दुकानातूनच या वस्तू खरेदी करण्याचे फ़रमाण बजावले आहे वास्तविक ते कॉन्व्हेंट वस्तू ज्या दराने विकतात त्यापेक्षा कमी दराने इतर दुकानावर सुद्धा मिळू शकतात मात्र शाळांनी केलेल्या सक्तीमुळे दुसरीकडे घेणे शक्य होत नाहीत आपला पाल्य त्याच्या शाळेत शिकतो आहे म्हणून अनेक लोक या भीतीपोटी तीकडे तक्रारी करत नाहीत  काही ठिकाणी शाळा सोडण्याचा दाखला करिता सुद्धा पैसे मागितल्या जातात म्हणून ही दुकानदारी थांबविण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा जर ही दुकानदारी थांबली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र स्वरूपात आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

वह्या पुस्तके आदी वस्तू करिता शाळांनी सक्ती केली आहे शिक्षण विभागाला हा प्रकार नवीन नाही मात्र तरीही शिक्षण विभागातील अधिकारी याकडे डोळे मिटून दुर्लक्ष करीत आहेत .उघड्या डोळ्या देखत काही शाळा शिक्षण विभागाच्या नाकावर टिचुन 18 महिन्याचा कालावधी होऊनही मन मानेल तिथे शाळा च्या नावावर दुकानदारी सुरू करीत आहेत. याकडे शिक्षण विभागने लक्ष देण्याची गरज आहे.

 

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close