You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
देशविदेशलाईफस्टाइल

शिरपूरच्या अंकुश शिंदे यांची वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड

शिरपूर दिनांक 24 जून(प्रतिनिधी)

प्रतिनिधी: Active न्युज

मराठा सेवा संघाच्या कक्षाच्या पुनर्बांधणीच्या  उद्देशाने राज्य कार्यकारिणीची बैठक दिनांक 22 आणि 23 जून रोजी मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे पार पडली शिरपूर जैन येथील मोटिवेशन टीचर प्रा. अंकुश दिगंबर शिंदे यांची वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड झाली आहे

मराठा सेवा संघाच्या 33कक्षांपैकी एक असलेली वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष पदी शिरपूर जैन येथील अंकुश दिगंबर शिंदे यांची निवड झाली आहे .हे मूळचे शिरपूर जैन येथील रहिवाशी आहेत आजवर त्यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली आहे. अनेक सामाजिक संस्थांनी  त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

महाराष्ट्रभर ते विद्यार्थी विकास अभियान  राबवितात या माध्यमातून ते संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन करतात या त्यांच्या कार्याची दखल घेऊन मराठा सेवा संघाने त्यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे.  सिंदखेड राजा येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकी साठी प्रदेश कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे ,प्रदेश महासचिव मधुकर मेहकरे, प्रदेश सचिव सोमनाथ लडके, राष्ट्रीय अध्यक्ष सुदर्शन तारक, प्रदेश अध्यक्ष भास्कर निर्मल, विभागीय अध्यक्ष आर एस पवार ,धनंजय पाटील औरंगाबाद जिल्हा सचिव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. अंकुश शिंदे यांच्या नियुक्तीने वाशिम जिल्ह्यामध्ये संघटन मजबूत होण्यास मदत होणार आहे. त्यांची महाराष्ट्र उपाध्यक्षपदी वर्णी लागल्याने शिरपूर येथील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे..

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close