You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
महाराष्ट्रलाईफस्टाइलवाशिम

दोन दिवसात ४ सापांना जीवदान….. ३ विषारी तर १ बिनविषारी सापाचा समावेश

सर्प मित्रांचे कौतुकास्पद कार्य.वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टिम ठरतोय वन्यजीव यांना वरदान

नवनाथ गुठे/ चोरद…

(प्रतिनिधी: Active न्युज)

दिनांक २३/०६/२०१९

प्रतिनीधी

मंगरुळपीर  व शाखा कोलार व वनोजा येथील सर्पमित्रांनी २ दिवसात ४ सापांना जीवदान दिले. यात ३ विषारी म्हणजेच नाग या जातीचे व १ बिनविषारी म्हणजे गवत्या सापाचा समावेश आहे. वनोजा येथील विहिरीत पडलेल्या नागाला  WCT Mangrulpir branch wanoja च्या सर्पमित्रांनी सुरक्षित रित्या विहिरी बाहेर काढून जीवदान दिले तसेच मानोरा तालुक्यातील गीरोली येथील श्याम डाखोरे यांच्या घरी साप निघाला त्यांनी हि माहिती वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टिम मंगरुळपीर शाखा कोलार च्या सदस्यांना दिली. माहिती वरून टिम चे सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले पाहणी केली असता सदर साप विषारी जातीचा नाग होता. त्यानंतर श्रीकांत डापसे यांनी मानद वन्यजीव रक्षक गौरव कुमार इंगळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्टीक व झोळीच्या सहाय्याने सदर सापाला सुरक्षित रित्या पकडुन कोलार येथील वनपरिक्षेत्रात सोडत जीवदान दिले. त्यानंतर मंगरुळपीर येथे साप निघाला त्यावेळी सर्पमित्र सुबोध साठे व सर्पमित्र गौरव कुमार इंगळे हे घटनास्थळी दाखल झाले व गवत्या बिनविषारी जातीच्या सापाला पकडून जीवदान दिले. त्यानंतर पुन्हा गीरोली येथील महेश आपा खळतकर यांच्या घरी साप निघाला त्यांनी हि माहिती कोलार येथील WCT Mangrulpir च्या सदस्यांना दिली माहिती वरून टिम चे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. व पाहणी केली असता सदर साप विषारी जातीचा नाग होता. नंतर सर्पमित्र गौरव कुमार इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्टीक व झोळीच्या सहाय्याने सापाला पकडण्यात यश आले. तेथे उपस्थित असलेल्या लोकांना त्या साप विषयी माहिती देण्यात आली. व कोलार येथील जंगलात सोडत जीवदान दिले…….आपल्या सभोवती किंवा परिसरात घराबाहेर गावात अश्या प्रकारे साप आढळून आल्यास आम्हाला कळवावे व तसेच वन्यप्राणी यांची गावामध्ये भटकंती किंवा जखमी अवस्थेत अपघात किंवा ईतर कुठल्याही प्रकारची माहिती वाईल्ड लाईफ कंझवर्शेन टिमला कळविण्यात यावे ….गौरवकुमार ईंगळे…मानद वन्यजीव रक्षक वाशिम जिल्हा… मो.नंबर..9860453242

 

Share
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close