You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
वाशिम

प्रत्येकाला विकास योजनेचा लाभ मिळावा – जिल्हाधिकारी मोडक

इतिहासात प्रथमच जिल्हाधिकारी जनुना खुर्द मध्ये

नवनाथ गुठे/ चोरद…

Active न्युज

दिनांक…२१/०६/२०१९…

गावकरी व प्रशासनाच्या समन्वयातून गावाच्या उन्नती साधता येईल. याकरिता नियमानुकूल शासकीय ज्या योजना राबवता येतील, त्या गावात राबवल्या जातील. प्रत्येकाला शासकीय योजनेचा लाभ मिळावा याकरिता मी स्वतः विशेष लक्ष केंद्रित करेल. असे आश्वासनात्मक उदगार जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी मुख्य भाषणात काढले. काटेपूर्णा जंगलात दुर्गम भागातील वनग्राम आदिवासी पाडा जनुना खुर्द येथे येऊन त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. स्वातंत्र्यानंतर प्रथमच या गावात जिल्हाधिकारी पोचल्याची नोंद आहे.

गुरुवार दि. 20 जून रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा प्रशासन व गावकरी यांच्या संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चोरद-जनुना गट ग्रामपंचायत सरपंच नाजुकराव घुगे,ग्रामविकास अधिकारी संजय पाचरणे,जिल्हा प्रकल्प अधिकारी हिवाळे, अकोला तहसीलदार किशोर बागडे, गटविकास अधिकारी टाकरस, तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी अरविंद भगत, मृदसंधारण उपविभागीय अधिकारी पाटील (कारंजा), अभियंता अजय कावळे, सामाजिक वनीकरण अधिकारी चौधरी, विस्ताराधिकारी राऊत, गटशिक्षणाधिकारी डाबेराव, स्वच्छ भारत मिशन अधिकारी राम शृंगारे आदी अधिकारी गण उपस्थित होते. बिरसा मुंडा व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.  याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी मोडक म्हणाले की,

“जनुना( खुर्द )हे गाव अतिशय दुर्गम भागात असल्यामुळे या गावात पाहिजे त्या प्रमाणात विकासात्मक योजना पोहोचू शकल्या नाहीत. परंतु आता सर्व योजना आपल्या गावकऱ्यांना मिळून गाव प्रगतीपथावर नेता येईल. याकरीता मी विशेष लक्ष केंद्रित करून राहील. परंतु यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे. आपले गाव संपूर्ण आदिवासी गाव असल्यामुळे आदिवासी विकास विभागाच्या वतीने व्यापक प्रमाणात योजना या गावात राबविण्याचा प्रयत्न राहील. जलसंधारण करण्याकरिता गावाच्या शिवारामध्ये 100 बाय 100 बाय दहा मीटरचा तलाव समृद्धी महामार्गाची सांगड घालून करण्यात आलेला आहे. अजून दोन तलाव याच प्रमाणे प्रस्तावित आहे. गावात रोजगारभिमुख कृषी व्यवस्था निर्माण करण्यावरही भर देण्याची गरज आहे.”

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जलहक्क कार्यकर्ते सचिन कुळकर्णी यांनी गावातील सर्व समस्या बारकाईने मांडल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नाना देवळे यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वृक्षरोपण करून दत्तक वृक्ष संवर्धन कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.

कार्यक्रमानंतर शाळेमध्ये जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्याची या गावातील विकासाकरता तब्बल दीड तास आढावा बैठक घेतली.

 

ज्या दुर्गम गावांमध्ये विकास योजना पोहोचल्या नाहीत त्या गावांमध्ये प्रशासन, शासन खाजगी संस्था, संघटना व गावकरी यांच्यात समन्वय साधून ग्रामविकास करण्याचे उद्दिष्ट असलेली कै. द्वारकाबाई मोडक स्मृती प्रकल्प या गावात राबविल्या जात आहे. पर्यावरणपूरक शाश्वत ग्राम विकासाचे मॉडेल तयार करण्याचे आमचे ध्येय आहे. अशी माहिती प्रकल्पाचे कार्यकारी अधिकारी सचिन कुळकर्णी यांनी दिली.

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close