You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
कृषिवार्ताक्राईमवाशिम

उंद्री प्रकल्पात शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

कारंजा

Active न्युज टीम

कारंजा तालुक्यातील बांबर्डा शिवाराला लागून असलेल्या उंद्री प्रकल्पात सिंचनाचे पाईप काढण्यासाठी बांबर्डा कानकिरड गेलेल्या शेतकर्‍याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदेर्वी घटना ५ जून रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. अनंत रामदास भेंडे असे मृतक शेतकर्‍याचे नाव आहे.
बांबर्डा कानकिरड येथील शेतकरी अनंत भेंडे हे उंद्री प्रकल्पात सिंचनाचे पाईप काढण्याकरीता गेले असता ते पाण्यात बुडाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शनी नागरिकांनी बांबर्डा येथील गावकर्‍यांना दिली. घटनेची माहिती मिळताच कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार धनंजय जगदाडे व धनज पोलिस स्टेशनचे ठाणेदार शिषिर मानकर यांनी तात्काळ आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले. सर्वधर्म आपतकालीन संस्था कारंजाच्या स्वयंसेवकांनी प्राथमिक शोध मोहीम राबविली. मात्र पाण्याची खोली अधिक असल्याने आपतकालीन पथकाला यश आले नाही. अखेर प्रशासनाने पिंजर येथील संत गाडगेबाबा बचाव पथकास पाचारण केले.
या पथकाला १ तासाच्या अथक पर्शिमानंतर शेतक-याचा मृतदेह शोधण्यात यश आले. बचाव पथकात दिपक सदाफळे, आशिक गुघडे, ऋषिकेश तायडे, मयुर जवके, ओम साबळे, ऋतिक सदाफळे, अंकुश सदाफळे, गोविंदा ढोके, यांचा समावेश होता. तर सर्वधर्मआपतकालीन पथकाचे शाम सवाई, ज्ञानेश्‍वर निंगोट, सतोंष घुले व भावेश गाडगे यांनी शोधमोहीमेत सहभाग नोंदविला.
घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. मंडळ अधिकारी नायब तहसीलदार विनोद हरणे, आशा अदबाने, तलाठी घाटे, ग्रामसेवक दिलीप सकपाळ यांची यावेळी उपस्थिती होती.
मृतक अनंत भेंडे हे बांबर्डा येथील सरपंच कांचन भेंडे यांचे पती आहेत. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे संपूर्ण तालुक्यात त्यांची वेगळी ओळख होती. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, तीन बहिनी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

 

Share
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close