You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्राईमदेशविदेश

मंदिरात जाणाऱ्यां मुलाला अमानुष मारहाण

Active न्युज टीम

वृत्तसंस्था/पाली
राजस्थानमधील पाली जिल्हय़ात अल्पवयीन अनुसूचित जातीच्या मुलाला हिंदुत्ववादी तरुणांनी अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलाला दोरीने बांधून त्याला काठीने मारहाण करण्यात आली असून मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राजस्थान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पाली जिल्हय़ात अल्पवयीन मुलाला काही तरुणांनी अमानुष मारहाण केली. हिंदू मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने त्याला मारहाण करण्यात आली, असे सांगितले जाते. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनेची दखल घेत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. हय़ा प्रकरणी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून मुलाची रवानगी बाल वसतीगृहात करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने दिली. स्थानिक माध्यमांमधील वृत्तानुसार, संबंधित मुलाने हिंदू मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता आणि यातूनच ही मारहाण करण्यात आली. मारहाण करणार्‍या तरुणांकडील भगव्या रंगाच्या उपरण्यावरून ते हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असावेत, असे सांगितले जाते.
मुलाला मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत काही तरुण पीडित मुलाला दोरीने बांधून त्याला काठीने मारहाण करताना दिसत आहे. मारहाणीदरम्यान त्याला शिवीगाळही केली जात आहे. पीडित मुलगा मारहाण करणार्‍यांना विनवणी करताना दिसत असून यानंतरही त्या तरुणांनी मारहाण सुरूच ठेवली. पाली जिल्हय़ातील धनेरिया गावात ही घटना घडली आहे. या व्हिडीओवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close