You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्राईमदेशविदेश

मोदींच्या नावाने लॅपटॉप स्कॅम, आयआयटी पदवीधराला अटक

तब्बल १५ लाख लोकांना या तरुणाने फसवले

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने मोफत लॅपटॉप वाटले जात आहेत असे सांगणारी फेक वेबसाईट तयार करून लोकांची गोपनीय माहिती चोरणार्‍या आयआयटी पदवीधराला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. राकेश जांगीड असे या तरुणाचे नाव असून तब्बल १५ लाख लोकांना या तरुणाने फसवले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
२३ वर्षांचा राकेश जांगीड राजस्थानातील नागौर जिल्हय़ातील पुंडलोटाचा रहिवासी आहे. २0१९मध्ये आयआयटी दिल्ली येथून पदव्युत्तर पदवी त्याने मिळवली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार दुसर्‍यांदा निवडून आल्याबद्दल मोफत लॅपटॉप वाटले जात आहेत अशी माहिती देणारा संदेश व्हाट्सअँपवर राकेश जांगीडने व्हायरल केला. ‘मेक इन इंडिया’च्या लोगोसह हा संदेश पाठवण्यात आला असल्याने अनेकांचा त्यावर विश्‍वास बसला. लॅपटॉपसाठी ६६६े.्िर-‘ंस्र३स्र.६्र२ँॅ४१४्न्र.ूे या संकेतस्थळावर नावनोंदणी करा असेही या संदेशात सांगण्यात आले होते. त्यानुसार तब्बल १५ लाख लोकांनी तिथे नावनोंदणी केली. नावनोंदणी सोबतच आधार कार्ड, बँक खाते अशा अनेक गोपनीय गोष्टींची माहिती या संकेतस्थळावर विचारण्यात आली होती. या माहितीच्या आधारे लोकांना लुटण्याचा या तरुणाचा प्लॅन होता.
या फेक वेबसाईटची कुणकुण दिल्ली पोलिसांच्या सायबरपॅड या सायबरसेलला लागली. संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला दिल्ली पोलिसांनी लगेच अटक केली. हैदराबादमधील एका खासगी कंपनीतील नोकरीवर पाणी सोडून या फेक वेबसाईटचा घाट या तरुणाने घातला होता. या वेबसाईवर येणार्‍या ट्रॅफिकच्या साहाय्याने गुगल अँड्स मिळवून पैसे कमवण्याचा आपला मनसूबा असल्याचे या तरुणाने चौकशीत कबूल केले आहे. तसेच लोकांचे बँक खाते आणि इतर माहितीच्या साहाय्याने त्यांना लुटून पैसे कमवणार असल्याचेही या तरुणाने पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान, या तरुणाची सखोल चौकशी केली जात असून याशिवाय अजून कोणी अशी फेक वेबसाईट चालवत आहेत का याची माहिती पोलिस काढत आहेत.

Share
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close