You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
शिक्षण व नोकरी

शहरात अवैध शिकवणी वर्गाचे पेव

योग्य कारवाईची मंगरुळपीर येथील फुलचंद भगत यांची मागणी

(प्रतिनिधी: Active न्युज)

मंगरुळपीर-सध्या शहरात अवैध शिकवणी वर्गाचे पेव फुटले असुन अशा शिकवणी वर्गावर प्रशासनाने नजर ठेवत शहरासह वाशिम जिल्हयातील अवैध खाजगी शिकवणी वर्गावर प्रतिबंध लावण्याची मागणी सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी गटशिक्षणाधिकारी यांचेकडे केली आहे.

चिखली शहरासह जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात अवैद्य शिकवणी वर्ग फार मोठ्या प्रमाणात फोफावत आहे,शिक्षण हे ज्ञानदानाचे पवित्र कार्य समजल्या जात होते मात्र आजरोजी संस्था चालकांनी शिक्षणाचा बाजार मांडला असून ज्ञानदानाचा उद्देश बाजूला ठेऊन आता फक्त पैसा कमावण्याचा धंदा म्हणून याकडे बघितल्या जात आहे,  जिल्हाभरात खासगी शिकवणी वर्गाला पेव फुटले असून कुठलीही पात्रता नसतांना काही जण झटपट पैसे कमावण्याचा सोप्पा मार्ग म्हणून हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करत आहेत, शिकवणी क्लासेसचे सम्पूर्ण नियम धाब्यावर बसवून क्लासेसचे मालक शिक्षणाच्या नावावर स्वतःची चांदी करून घेत आहेत. मंगरुळपीर शहरात  पावला पावलावर अवैध शिकवणी वर्गाचे पीक जोमात वाढत आहे,तसेच शिकवणी वर्गात मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे बऱ्याच क्लासमध्ये मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधन गृह नाहीत ,आधीच मंगरुळपीर शहरात चिडिमारीचेही प्रकार होतांना दिसत असुन अशा अवैध क्लासेसमधेही मुलींच्या सुरक्षिततेची काळजी घेतली नसल्याचे दिसते तसेच क्लासेमध्ये सिसिटीव्ही कॅमेरेही नाहीत त्यामुळे शिकवणी वर्गात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असून कोणत्याच क्लासेसमध्ये अग्नी सुरक्षिततेच्या कुठल्याच उपाययोजना नाहीत,नुकत्याच सुरतमधील तक्षशिला नावाच्या कोचिंग क्लासेसच्या इमारतीला आग लागल्याची घटना घडून त्यात विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समोर आले तरी कोचिंग क्लासेसचे संचालक अपुऱ्या सुरक्षितते अभावी एक प्रकारे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहेत ,वाशिम जिल्हयातही सुरत येथील घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही ,असे अवैध शिकवणी वर्गावाले विद्यार्थ्याकडुन अनिर्बंध फी आकारुन लुट करीत आहेत.विद्यार्थ्यांनी क्लास लावलेले असतात म्हणून काही शिक्षकही शिकवन्याकडे दुर्लक्ष करतात परिणामी काॅपी करन्याचे प्रकार वाढुन विद्यार्थ्यांची गुणवत्ता घटत आहे त्यामुळे अवैध शिकवणी वर्गावर योग्य ती कारवाई करून अवैध शिकवणी वर्ग बंद करावे अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडू असे सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी गटशिक्षणाधिकारी यांना निवेदनाव्दारे सांगितले आहे.

 

Share
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close