You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
ताज्या बातम्यादेशविदेश

भाजपचे पुढील अध्यक्ष कोण होणार ?

भाजप अध्यक्षपदासाठी हालचाली सुरू

News Network  / नवी दिल्ली

Active न्युज टीम

ळ्यात पडणार यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत. शनिवारी गृहमंत्री अमित शहा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भाजपच्या सरचिटणीसांसोबत बैठक घेऊन चर्चा केली.
या बैठकीमध्ये पक्षांतर्गत निवडणुका लवकरात लवकर घेण्यावरही चर्चा झाली. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मार्ग मोकळा होईल. देशातील ५0 टक्के निवडणुका पार पडल्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकते. गेल्यावर्षी २0१८ मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अमित शहांना सहा महिने मुदतवाढ देण्यात आली होती. शहा यांनी आपली कामगिरी चोख पार पाडून भाजपला एकहाती यश मिळवून दिले. आता त्यांना गृहमंत्रीपद देण्यात आल्याने नवीन नावाचा विचार सुरू झाला आहे. भाजप अध्यक्षपदासाठी जे. पी. नड्डा आणि भूपेंद्र यादव यांची नावे आघाडीवर आहेत. या दोन नावांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. यामध्येही नड्डा यांचे नाव अग्रभागी आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपने उत्तर प्रदेशात दमदार यश मिळवले होते. त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही. नड्डा हिमाचल प्रदेशातील ब्राह्मण कुटुंबातील असून भाजपच्या उच्चस्तरीय वतरुळाच्या र्मजीतील आहेत. त्याचबरोबर अमित शहा यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. मोदी यांच्या पहिल्या सरकारमध्ये ते आरोग्यमंत्री होते. नड्डा भाजपच्या संसदीय बोर्डाचे सदस्य आहेत. त्यामुळे नड्डा आघाडीवर आहेत. भूपेंद्र यादव भाजपमध्ये अनेक जबाबदार्‍या सांभाळल्या आहेत

Share
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...
Tags
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close