You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
मालेगावलाईफस्टाइल

शिरपुर जैन येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी!

शिरपूर दि. ३१मे (प्रतिनिधी)

Active न्युज टीम

शिरपुर जैन येथे स्थानिक होळकर चौक, ग्रा.पं.कार्यालय व स्थानिक ढवळे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९४ वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.

स्थानिक होळकर चौक वॉर्ड नं ५ मधील संत ज्ञानेश्वर मंदिर मध्ये सर्व समाज बांधवांच्या वतीने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ समाज बांधव सखाराम जटाळे हे होते तर प्रमुख उपस्थिती ज्ञानेश्वर गावंडे,डॉ गजानन ढवळे, नारायण बोबडे, पुंजाजी जटाळे यांच्या सह शेकडो समाज बांधव उपस्थित होते.

सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

उपस्थित मान्यवरान पैकी नारायण बोबडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या बालपणाच्या आठवणीस उजाळा देऊन त्यांनी संपूर्ण आयुष्यात ज्या प्रकारे संघर्ष करून होळकर शाहीचा झेंडा संपूर्ण देशात अभिमानाने डोलवत राहिल्या या बद्दल माहिती सांगितली, तर पुंजाजी जटाळे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला

कार्यक्रमाचे सूत्र संचलन संतोष घाटोळ यांनी केले तर आभार ओंकार बोबडे याने मानले या कार्यक्रमास शेकडो पुरुष व महिलांची उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व अहिल्या नवयुवक मंडळाचे सर्व कार्यकर्ते व गावकरी मंडळींनी सहकार्य केले

ग्रा. प. कार्यालया व गावकरी मंडळींच्या वतीने सुद्धा उत्साह पूर्ण वातावरणात अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अशोक अंभोरे हे होते तर प्रमुख उपस्थिती सिताराम बोबडे, नारायण बोबडे, पुंजाजी जटाळे, विजय अंभोरे, गणेश अंभोरे, दत्ता भांदुर्गे,  व सर्व पत्रकार बांधव हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रा.पं.कर्मचारी संतोष देशमुख यांनी केले.

यावेळी जय मल्हार नवयुवक मंडळाच्या वतीने ग्रा.प.कार्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली.

*****

 

त्याच प्रमाणे स्थानिक कै.कोंडबा तात्या ढवळे विद्यालय येथे सुद्धा अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी शाळेचे मु.अ.अर्जुन वाहुरवाघ, कैलास ढवळे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Share
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close