You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
कारंजाक्राईममहाराष्ट्र

कामरगावात चोरट्यांनी फोडली एकाच रात्री दोन दुकाने

सव्वा लाखांच्या मुद्देमालावर केला हातसाफ, श्वानपथक व फिंगरप्रिट एक्सपर्टला पाचारण

प्रतिनिधी: Active न्युज)

कामरगांव—- कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे अज्ञात चोरट्यांनी सराफा दुकान व हेअरसलुनचे दुकान  फोडुन सव्वा लाखाच्या मुद्देमालावर हात साफ केल्याची घटना 30 मे रोजी सकाळी उघडकीस आली. दरम्यान दुकानमालकाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करून श्वानपथक व फिंगरप्रींट एक्सपर्टला पाचारण केले. परंतु चोरट्यांचा सुगावा लागला नाही. घटनेची माहिती मिळताच मंगरूळपीर उपविभागीय पोलिस अधिकारी नंदा परांजे यांनी घटनास्थळी भेट देवून पुढील तपासाबाबत पोलिसांना सूचना दिल्या.प्राप्त माहितीनुसार कामरगाव येथील बसस्थानक मार्गावरील परंपरा ज्वेलर्स व गणराज हेअर सलुन चे शटर वाकवून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. परंपरा ज्ेवलर्समधील 3 किलो चांदीचे दागिणे किंमत सव्वा लाख रूपये असा मुद्देमाल लंपास केला. तर गणराज हेअर सलुनचे शटर वाकवून सुध्दा दुकानात प्रवेश मिळविला. परंतु चुकीचे दुकान फोडल्याचे लक्षात येताच चोर माघारी फिरले व त्यानंतर परंपरा ज्वेलर्सचे शटर वाकवून दुकानात प्रवेश केला. दरम्यान दुकान मालक कपील अशोक ठाकरे रा. बेंबळा यांच्या फिर्यादीवरून कामरगाव चैकीतील पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द कलम 461 व 380 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास धनज पो स्टे चे ठाणेदार शिषिर मानकर करीत आहे. दरम्यान 8 दिवसांपूर्वी परराज्यातील जवळपास 50 लोक साड्या व मूर्ती विकण्यासाठी कामरगावात दाखल झाले होते. परराज्यातील लोक एवढ्या मोठ्या संख्येने कामरगावात दाखल होउुन देखील पोलिसांनी त्यांची नोंद घेतली नाही. त्यांमुळे त्यांच्यातीलच कुणी ही चोरी केली असेल का, असा संशय व्यक्त केल्या जात आहे. शिवाय कामरगाव पोलिस चैकीला 14 खेडे जोडले असल्याने कार्यक्षेत्राचा व्याप वाढला आहे. त्यादृष्टीने कामरगाव पोलिस चैकीत पोलिसांचे संख्याबळ नाही. त्यामुळे कामरगाव पोलिस चैकीत पोलिसांचे अधिक संख्याबळ देण्याची तसेच कामरगावात रात्री पोलीसांनी गस्त घालण्याची मागणी ग्रामस्थांकडून केल्या जात आहे. दरम्यान एकाच रात्री दोन दुकान फोडल्याने व्यापाÚयात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close