You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
आरोग्यमहाराष्ट्रलाईफस्टाइल

दगडीत गटारीचे काम अपुर्ण अवस्थेत पडुन

गोकुळ  तायडे

मनवेल ता यावल (वार्ताहर )

Active न्युज टीम

येथुन जवळच असलेल्या दगडी या गावातील आ.नीधीतुन बांधण्यात येत असलेल्या गटारी अपुर्ण अवस्थेत पडुन असल्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये त्या ठेकेदारां बद्दल  त्रीव संताप  व्यक्त होत आहे.

आ.चंद्रकात सोनवणे यांच्या नीधीतुन दगडी या आदीवासी लोकवस्तीचा छोट्याशा गावात महिला शौचालय व गटारी साठी नीधी मंजुर करण्यांत आला असुन शौचालय व गटारीचे बांधकाम अपुर्ण सोडुन उरलेले रेती व सिमेंट खडी असे साहीत्य घेउन काम अपुर्ण ठेवल्याने ग्रामस्थांकडून त्रीव संताप व्यक्त होत आहे.

गटारीचे काम निष्कृट दर्जाचे व विना फीनीशनचे केले असुन सांडपाणी काढण्यासाठी जागा सोडलेली नसल्यामुळे पावसाळ्यात गटारी भरुन सांडपाणी वाहुन जाण्यासाठी जागा नसल्यामुळे येथील आदीवासी जनतेच्या आरोग्य धोक्यात येउन रोगराई पसरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

गटारी बांधकामावर अनेक ठिकाणी रहीवाशी असुन गटारीवर ढापे टाकण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यांत आली मात्र ठेकेदारांने गटारीचे बांधकामाची मोजणी करुनही अपुर्ण अवस्थेत सोडल्याची तक्रारी येथील रहीवाशी करीत आहे.

संबंधित अधिकाऱ्यांनी दगडी या गावात प्रत्यक्ष भेट देउन गटारीची पाहणी करुन अपुर्ण गटारीचे काम पुर्ण करण्यांची मागणी दगडी गावातील ग्रामस्थ करीत आहे.

(छाया- गोकुळ  तायडे मनवेल )

दगडीत अपुर्ण अवस्थेत असलेली  गटार

 

Share
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...
Tags
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close