You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
कृषिवार्तामहाराष्ट्र

कृषि विद्यापीठांच्या संशोधनांचे गुणात्मक विश्लेषण होणे गरजेचे कृषि विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहचविणे गरजेचे – कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा राहुरी

राहुरी   – बद्रिश देहाडराय

(प्रतिनिधी: Active न्युज)

सन 2022 पर्यंत शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प सरकारने घेतला आहे. त्या अनुशंगाने शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाने एकात्मिक शेती पध्दतीचे मॉडेल विकसीत केले आहे. या मॉडेलचा प्रत्येक हवामान विभागात प्रात्यक्षिक होऊन त्याचा योग्य प्रसार होणे गरजेचे आहे. सर्व कृषि विद्यापीठांनी मोठ्या प्रमाणावर गुणात्मक संशोधन केलेले आहेत. या संशोधनाचा वापर करुन शेतकर्यांचे जीवनमान उंचविले आहेत. पण या प्रत्येक संशोधनाचे/विकसीत वाणांचे गुणात्मक विश्लेषण होणे गरजेचे आहे. कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतकर्यांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे तसेच प्रत्येक संशोधनाचा शेतकर्यांच्या उत्पन्नावर होणार्या परिणामाचे विश्लेषण होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कुलगरु डॉ. के.पी. विश्वनाथा यांनी केले.

महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी कृषि विद्यापीठ येथे तीन दिवसीय संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीची 47 वी बैठकीचे उद्घाटन संपन्न झाले. या प्रसंगी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा बोलत होते. या प्रसंगी इतर तीनही विद्यापीठांचे कुलगुरु डॉ. विलास भाले (अकोला), डॉ. अशोक ढवण (परभणी), डॉ. संजय सावंत (दापोली), संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, पुष्प संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. के.व्ही. प्रसाद, कृषि परिषदेचे संशोधन संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, सर्व कृषि विद्यापीठांचे संचालक, डॉ. अशोक फरांदे, डॉ. दत्तप्रसाद वासकर, डॉ. दिपक मानकर, डॉ. विलास खर्चे, डॉ. यु.डी. पाटील, डॉ. पी.जी. इंगोले, डॉ. पराग हलदणकर, डॉ. एस.एस. नारखेडे, डॉ. संजय भावे, नियंत्रक श्री. विजय कोते, कुलसचिव श्री. सोपानराव कासार, कृषि परिषदेचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. विठ्ठल शिर्के उपस्थित होते.

या प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले म्हणाले की विद्यापीठांनी शेतकर्यांच्या दृष्टिने फायदेशीर ठरेल अशा संशोधनावर लक्ष केंद्रित करावे. विकसीत केलेले तंत्रज्ञान/संशोधन जास्तीत जास्त प्रकाशीत व्हायला हवे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, विद्यापीठातील संशोधन हे सतत चालणारी प्रक्रिया आहे. बदलत्या हवामानामुळे विद्यापीठाने केलेले संशोधन/शिफारशी लवकर कालबाह्य होत आहे. त्यासाठी हवामानावर आधारीत आणि शेतकरीभिमुख संशोधन होणे गरजेचे आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरु डॉ. एस.डी. सावंत म्हणाले की, शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पिकात संशोधन करतांना संबंधीत पिकांच्या नावाने त्या शास्त्रज्ञांची ओळख होईल असे काम करणे महत्वाचे आहे. नविन वाण विकसीत करतांना उत्पादनावर भर देण्याबरोबरच त्याची प्रत आणि पोषणमुल्य यावर जास्त भर दिला जाण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि स्वागत डॉ. शरद गडाख यांनी केले. प्रास्तविकात त्यांनी आतापर्यंत सर्व कृषि विद्यापीठांनी संशोधनात केलेल्या योगदानाचा आढावा सादर केला. याप्रसंगी द्राक्षावरील राष्ट्रीय संशोधन संस्थेचे संचालीका डॉ. इंदू सावंत, लिंबूवर्गीय राष्ट्रीय संशोधन संस्थेचे संचालक डॉ. आय.पी. सिंग, राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एन.पी. सिंग, अटारी संचालक डॉ. लाखन सिंग, माजी संचालक विस्तार शिक्षण डॉ. के.डी. कोकाटे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. नलगे, डॉ. राणे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बापुसाहेब भाकरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. हरिहर कौसडीकर यांनी केले. याप्रसंगी चारही कृषि विद्यापीठातील सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, सहयोगी संशोधन संचालक आणि 450 पेक्षा जास्त शास्त्रज्ञ, अधिकारी, प्रगतशिल शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Share
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close