You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
कृषिवार्ता

जामखेड येथील शेतकरी रामेश्वर व्यंलकटी मस्के यांच्या राहत्या घराला आग

शासनाने व सामाजिक संघटनेने आर्थिक मदत करावी - गोपाल पाटील राऊत

(प्रतिनिधी: Active न्युज)

प्रदीप सावले

मालेगाव तालुक्यातील जामखेड येथील शेतकरी रामेश्वर व्‍यंकटी मस्के यांच्या राहत्या घराला 27/ 5 /2019 रोजी आग लागली असून त्यांच्या घरातील संपूर्ण साहित्य जळून खात झाले असून त्यांना जीवन जगण्याच्या साठी लागणाऱ्या कुठले प्रकारे साहित्य त्यांच्याकडे उपलब्ध नाही तरी त्यांना शासनाने व जिल्ह्यातील सामाजिक संघटनेने आर्थिक मदत करणे नितांत आवश्यकता असून त्यांना मानसिक आधार देण्याची आवश्यकता आहे

भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य गोपाल पाटील राऊत हे दिनांक 28 /5/ 2019 रोजी सकाळी सदर शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली त्यामध्ये तूर सोयाबीन गहू उडीद व आर्थिक पैसे सर्व जीवनावश्यक  संसारोपयोगी भांडी सर्व सामान कपडे जळून  राख झाले असून त्यांचा संपूर्ण संसार उघड्यावर आला असून त्यांना आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता असून गोपाल पाटील राऊत यांनी स्वतः आर्थिक मदत केली असून त्यांना अन्नधान्यासाठी जळका येथील डीलर अंबादास देशमुख यांनी गहू तांदूळ यांची सुद्धा मदत केली असून त्यांच्या जगण्यासाठी अंगावर कपडे व खाण्यासाठी अन्नाची सुद्धा त्यांच्याकडे सोय नाही तरी एक शेतकरी आपला अडचणीत असताना शासनाने व जिल्ह्यातील सामाजिक संघटनेने त्यांना मदत करणे नितांत आवश्यकता आहे सदर गोपाल पाटील राऊत यांनी सर्व त्यांच्या झालेल्या घराची पाहणी केली असून त्यांच्यासोबत पंचायत समिती सदस्य पती गजानन लोखंडे राजू पोफळे उपसरपंच धनगर व गावातील बरेच कार्यकर्ते हजर होते रामेश्वर मस्की या शेतकऱ्याचे साडेचार लाख रुपयांचे आगीमध्ये नुकसान झाले असून त्यांना शासकीय अधिकाऱ्यांनी व सामाजिक संघटनांनी आर्थिक व मानसिक आधार देण्याची नितांत आवश्यकता आहे याप्रसंगी गोपाल पाटील राऊत यांनी आग ग्रस्त शेतकरी श्री मस्के यांना आपण सर्वतोपरी मदत करून मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असा आत्मा विश्वास दिला आणि तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना आर्थिक मदत शासनाकडून मिळवून देण्याची हमी दिली त्यामुळे सदर शेतकऱ्यांचा काही प्रमाणात समाधान झाले सदर शेतकऱ्यांच्या व्यथा विचारताना त्याच्या डोळ्यातील अश्रू अनावर होत होते कारण या शेतकऱ्याचा सर्व संसार उघड्यावर आला असून त्यांना जिल्ह्यातील सामाजिक संघटनेने आर्थिक मदत करावी त्यांना मदत करायची असल्यास पंचायत समिती सदस्य गजानन लोखंडे यांना भ्रमणध्वनीवर फोन करावा कारण या शेतकऱ्याजवळ मोबाईल सुद्धा नाही कारण मोबाईल जळून खाक झालेला आहे या शेतकऱ्याला आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे तरी जिल्ह्यातील सामाजिक संघटनेने या शेतकऱ्याला आधार द्यावा अशी विनंती प्रदेश सदस्य गोपाल पाटील राऊत यांनी सामाजिक संघटनांना केली

Share
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...
Tags
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close