You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
कृषिवार्तामहाराष्ट्र

‘महसूल’च्या संकेतस्थळांत तांत्रिक बिघाड!

बारकोड सातबारा ‘डाऊनलोड’ होईना : शेतकºयांना महा-ई-सेवा केंद्राचे हेलपाटे

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

नवनाथ गुठे/ चोरद

प्रतिनीधी…..

Active न्युज टीम

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून जनतेच्या सोयीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या ‘महाभूलेख़महाराष्ट्रग़व्ह़इन’ या अधिकृत संकेतस्थळांत तांत्रिक बिघाड झाला आहे़ त्यामुळे बारकोड असलेला सातबारा ‘डाऊनलोड’ होत नसल्याने हा दाखला मिळविण्यासाठी शेतकºयांना महा-ई-सेवा केंद्राचे खेटे खावे लागत आहे़

सातबारा हा अतिशय महत्त्वाचा महसूल दस्तावेज आहे़ तो विविध शासकीय कामांसाठी वापरला जात असून, शासनाने डिजिटल, बारकोड व महाभूमिलेख संकेतस्थळावर हा दाखला उपलब्ध करून दिला आहे़ शेतकºयांना सातबारा मिळविताना नाहक त्रास होऊ नये, हा यामागील हेतू आहे़ तथापि, शेतकºयांना सहजासहजी सातबारा उपलब्ध होत नाही, असा अनुभव शेलुबाजार व चोरद  परिसरातील शेतकºयांना येत आहे़ शासनाच्या  ‘महाभूलेख़महाराष्ट्रग़व्ह़इन’ या संकेतस्थळावर गेल्यानंतर शेतकºयांना बारकोडचा सातबारा मिळतो़ पूर्वी अनेक शेतकरी महा-ई-सेवा केंद्रावर पोहोचून बारकोड सातबारा मिळवित होते़ परंतु, गेल्या मार्च महिन्यपासून  या संकेतस्थळांत तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे़ परिणामी बारकोड सातबारा डाऊनलोड होत नसल्याने शेतकºयांना महा-ई-सेवा केंद्रावरून आल्यापावली परतावे लागत आहे़ एका आठवड्यापासून हा प्रकार सुरु असल्याने शेतकरी अक्षरश: वैतागले आहेत़ शासनाने संकेतस्थळामधील बिघाड दुरुस्त करुन आॅनलाइन बारकोड सातबारा उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे़

 ‘ओटिपी’ची अट रद्द पण त्रास कायमच

महसूल विभागाच्या संकेतस्थळावरुन ‘डिजिटल’ सातबारा मिळविण्यासाठी पूर्वी ‘ओटिपी’ची अट टाकण्यात आली होती़ या ‘ओटिपी’पायी शेतकºयांना तासनतास ग्राहक सेवा केंद्रावर ताटकळत राहावे लागत होते़ परंतु, शासनाने ‘ओटिपी’ची रद्द केली़ परंतु, सातबारा मिळविण्यासंबंधीचा त्रास मात्र अजुनही कायमच असल्याचे दिसून येते़

Share
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close